शाहिद कपूरने खास रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या मीराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 18:20 IST2023-09-07T18:19:15+5:302023-09-07T18:20:28+5:30
आज मीरा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Shahid Kapoor-mira
बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कोणत्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. तीदेखील इतर सेलिब्रेटींच्या इतकीच ग्लॅमरस व बोल्ड आहे. त्यामुळे ती कायम चर्चेत येत असते. आज मीरा आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. रोमँटिक फोटोसह शाहिदने पत्नी मीरा राजपूतला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोत त्यांची केमिस्ट्री दिसून आली.
दिल्लीत जन्मलेल्या मीरा राजपूतने उच्च शिक्षण घेतले आहे. कॅट निकालात ती टॉप-10 मध्ये होती. मीरा तिचे शिक्षण पूर्ण होताच, तिच्या आयुष्यात शाहिद आला होता. शाहिद मीराला पहिल्यांदा भेटला, तेव्हा तो उडता पंजाब या चित्रपटाचं शूटिंग करत होता. चित्रपटातल्या लूकमध्ये तो मीराला भेटायला आला होता. यानंतर दोघांच्या आणखी दोन-तीन भेटी झाल्या. त्यानंतर मीरा आणि शाहिदने एकमेकांना कायमचे जोडीदार म्हणून निवडले.
बॉलिवूडमधील मोस्ट लव्हेबल कपल म्हणून अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्याकडे पाहिलं जातं. 2015 साली शाहीद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहीदच्या घरी मीशा नावाचे कन्यारत्न जन्मास आले. यानंतर 2018 मध्ये शाहीदला पुत्ररत्न प्राप्त झाले.
शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. लग्न झाले आणि शाहिद मीरा एकमेकांसाठी ‘मेड फॉर इज अदर’ सिद्ध झालेत. आजही त्यांच्याकडे पाहिल्यावर अवघ्या काही महिन्यांपूर्वीच यांचं लग्न झाल्यासारखं वाटतं. अनेकदा ही जोडी जाहीरपणे एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात.