Rajpal Yadav: पुरस्कार सोहळ्यात निवेदकांनी उडवली राजपाल यादवची खिल्ली; अभिनेता म्हणाला- "कायम ते माझा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:18 IST2026-04-07T16:15:58+5:302026-04-07T16:18:36+5:30

Rajpal Yadav Reaction on Viral Video: एका पुरस्कार सोहळ्यात शोच्या निवेदकाने सर्वांसमोर राजपाल यादवने जे कर्ज घेतलं त्याची खिल्ली उडवली आणि मस्करी केली. आता या सर्व प्रकरणावर राजपाल यादवने व्हिडीओ पोस्ट करुन त्याचं मत मांडलंय. काय म्हणाला राजपाल?

saurabh dwiwedi mocked Rajpal Yadav at the screen awards ceremony actor revealed | Rajpal Yadav: पुरस्कार सोहळ्यात निवेदकांनी उडवली राजपाल यादवची खिल्ली; अभिनेता म्हणाला- "कायम ते माझा..."

Rajpal Yadav: पुरस्कार सोहळ्यात निवेदकांनी उडवली राजपाल यादवची खिल्ली; अभिनेता म्हणाला- "कायम ते माझा..."

नुकतंच स्क्रीन पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका उपस्थित होते. त्यावेळी शोच्या निवेदकाने सर्वांसमोर राजपाल यादवने जे कर्ज घेतलं त्याची खिल्ली उडवली आणि मस्करी केली. त्यामुळे त्या निवेदकाला सर्वांनी चांगलंच ट्रोल केलं आणि त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. आता या सर्व प्रकरणावर राजपाल यादवने व्हिडीओ पोस्ट करुन त्याचं मत मांडलंय. काय म्हणाला राजपाल?

राजपाल यादवने सर्वांना केली विनंती

राजपाल यादव व्हिडीओ पोस्ट करुन सांगतात की, ''जगात युद्ध आहे, अर्थव्यवस्था आहे आणि त्यामुळे अनेक गोष्टी वर-खाली होत आहेत. हे विषय डोक्यात ठेऊन स्क्रीप्टची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हे लिखाण योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जाकिर खान आणि सौरभ द्विवेदी यांना मन दुखावू नका. दोघेही माझ्या छोट्या भावासारखे आहेत. कायम ते माझा सन्मान करतात. त्यामुळे उगाचच त्यांची निदा करुन त्यांना दुखावू नका.'' राजपाल यादव यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताच जाकीर आणि सौरभ या दोघांनी त्यांचे आभार मानले आहेत. 



या पुरस्कार सोहळ्यात 'डॉलर किंवा रुपया कितीही वर-खाली होऊदे, तुम्हाला तुमचं जितकं कर्ज बाकी आहे तितकं फेडावंच लागेल', अशा शब्दांत राजपालची मस्करी करण्यात आली होती.आता राजपाल यादवने सर्व चाहत्यांना कोणाला दोष देऊ नये ही विनंती केलीय. राजपालची शोमध्ये जी खिल्ली उडवली त्यावर अनेकांनी त्याला सपोर्ट केला आहे. इतकंच नव्हे सलमान खानने पण राजपाल यादवची बाजू घेतली.

Web Title : राजपाल यादव ने कर्ज पर मज़ाक के बाद कॉमेडियन का बचाव किया।

Web Summary : राजपाल यादव ने प्रशंसकों से पुरस्कार शो में अपने कर्ज पर मजाक करने वाले कॉमेडियन जाकिर खान और सौरभ द्विवेदी को दोष न देने का अनुरोध किया। वह उन्हें भाई मानता है और उनके सम्मान की सराहना करता है। उसने सभी से अनावश्यक आलोचना से बचने को कहा।

Web Title : Rajpal Yadav defends comedians after joke about his debt.

Web Summary : Rajpal Yadav requests fans not to blame comedians Zakir Khan and Saurabh Dwivedi for a joke about his debt at an award show. He considers them like brothers and appreciates their respect for him. He asks everyone to avoid unnecessary criticism.