शूटिंगवेळी सौम्या टंडनने अक्षय खन्नाला खरंच लगावली होती थापड; 'धुरंधर'मधील 'त्या' सीनबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:23 IST2025-12-22T11:21:02+5:302025-12-22T11:23:04+5:30

Saumya Tandon : 'धुरंधर' या चित्रपटात अभिनेत्री सौम्या टंडन हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आता सौम्याने एका पोस्टद्वारे खुलासा केला आहे की, तिने या चित्रपटात अक्षय खन्नाला खरंच थापड लगावली होती.

Saumya Tandon really slapped Akshaye Khanna during shooting; Actress makes big revelation about 'that' scene in 'Dhurandhar' | शूटिंगवेळी सौम्या टंडनने अक्षय खन्नाला खरंच लगावली होती थापड; 'धुरंधर'मधील 'त्या' सीनबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

शूटिंगवेळी सौम्या टंडनने अक्षय खन्नाला खरंच लगावली होती थापड; 'धुरंधर'मधील 'त्या' सीनबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून 'धुरंधर' संपूर्ण देशात चर्चेत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या थरारक स्पाय थ्रिलरमध्ये रणवीर सिंग, आर. माधवन आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. टेलिव्हिजन स्टार सौम्या टंडनने चित्रपटात अक्षय खन्नाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. एका जबरदस्त इमोशनल सीनसाठी तिचे खूप कौतुक होत आहे, ज्याने प्रेक्षकांनाही थक्क केले आहे. खरेतर, एका अत्यंत हृदयस्पर्शी सीनमध्ये सौम्याचे पात्र आपल्या पतीला थापड लगावते. या सीनने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. दरम्यान, सौम्याने नंतर खुलासा केला की, पडद्यावर दिसलेली ती थापड पूर्णपणे खरी होती आणि एकाच 'टेक'मध्ये चित्रीत करण्यात आली होती.

रविवारी सौम्याने तिच्या एक्स अकाउंटवर शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आणि तिच्या भावनिक अनुभवाबद्दल सांगितले. पहिल्या फोटोमध्ये ती दिग्दर्शक आदित्य धर आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत सीनवर चर्चा करताना दिसत आहे. यासोबत तिने लिहिले, "हा चित्रपटातील माझा एन्ट्री सीन होता आणि त्याला मिळालेल्या प्रेमाने मी खरोखरच भारावून गेले आहे. या सीनमध्ये मला एकाच वेळी अनेक भावना जाणवल्या. माझ्या पतीबद्दलचा राग, कारण तेच आमच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत होते, असहायता आणि नैराश्य, आणि आम्हा दोघांमधील खोलवर रुजलेलं दुःख. आणि हो, मी अक्षयला एकदा खरंच थापड मारली, त्यांच्या क्लोज अप शॉट दरम्यान; कारण आदित्यने हा सीन खरा वाटावा असा आग्रह धरला होता."

ती पुढे म्हणाली, "मी खोटे मारतानाची अपेक्षा करत होते, पण तसे होऊ शकले नाही. माझा ब्रेकडाऊन क्लोज-अप शॉट एकाच टेकमध्ये शूट करण्यात आला होता." दुसऱ्या फोटोमध्ये सौम्या एका प्रार्थना सभेच्या वेळी जमिनीवर बसलेली दिसत आहे. त्या क्षणाची भावनिक तीव्रता व्यक्त करताना तिने लिहिले, "ही माझ्या मुलाच्या निधनानंतरची प्रार्थना सभा होती. त्या क्षणाचे दुःख माझ्या मनात घर करून होते, ते थेट मनातून आले होते."

'धुरंधर'चा दुसरा भाग कधी रिलीज होणार?
‘धुरंधर’ चित्रपट 'हमजा' या भारतीय गुप्तहेराच्या कथेवर आधारित आहे, जो रहमान डकैतच्या टोळीचा भाग होण्यासाठी पाकिस्तानमध्ये घुसतो. चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांच्याशिवाय अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'धुरंधर'चा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title : सौम्या टंडन ने 'धुरंधर' की शूटिंग के दौरान अक्षय खन्ना को थप्पड़ मारने की पुष्टि की।

Web Summary : सौम्या टंडन ने खुलासा किया कि उन्होंने 'धुरंधर' के एक दृश्य के लिए अक्षय खन्ना को वास्तव में थप्पड़ मारा था। उन्होंने पर्दे के पीछे की तस्वीरें साझा करते हुए भावनात्मक तीव्रता और सिंगल-टेक क्लोज-अप का वर्णन किया। 'धुरंधर' का सीक्वल 19 मार्च, 2026 को रिलीज होगा।

Web Title : Saumya Tandon confirms slapping Akshay Khanna during 'Dhurandhar' shoot.

Web Summary : Saumya Tandon revealed she genuinely slapped Akshay Khanna for a 'Dhurandhar' scene. She shared behind-the-scenes photos, describing the emotional intensity and the single-take close-up. 'Dhurandhar' sequel releases March 19, 2026.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.