'या' कारणाने संजय दत्तला रस्त्यावर मागावी लागली होती भीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 14:03 IST2018-06-14T13:36:13+5:302018-06-14T14:03:36+5:30

ट्रेलरवरुनच अनेकांना याचा अंदाज आला. आता प्रेक्षक हा सिनेमा बघण्यासाठी आणि संजय दत्तबाबत जाणून घेण्यासाठी आतुर आहे. 

Sanju new posters revealed by Rajkumar Hirani with unknown interesting facts | 'या' कारणाने संजय दत्तला रस्त्यावर मागावी लागली होती भीक?

'या' कारणाने संजय दत्तला रस्त्यावर मागावी लागली होती भीक?

मुंबई : संजय दत्त याच्या जीवनावर आधारित 'संजू' सिनेमातून त्याच्याबाबत अनेक नवे खुलासे होणार आहेत. ट्रेलरवरुनच अनेकांना याचा अंदाज आलाय. आता प्रेक्षक हा सिनेमा बघण्यासाठी आणि संजय दत्तबाबत जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. 

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुन सिनेमाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. त्यासोबतच संजय दत्तच्या जीवनाशी निगडीत एक गोष्टही सांगितली आहे. सिनेमाच्या टीझर-ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, संजय दत्त रस्त्यावर बसून भीक मागतो आहे. याबाबत राजकुमार हिरानी यांनी सांगितले की, 'अमेरिकेत संजू नशा मुक्ती केंद्रातून पळून गेला होता. नंतर आपल्या मित्राला भेटायला जाण्यासाठी त्याच्याकडे बस तिकीटचे पैसे नव्हते. त्यामुळे त्याच्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली होती'. 


दुसऱ्या पोस्टमध्ये हिरानी यांनी सांगितले की, संजय दत्तचा पहिला सिनेमा रॉकीच्या प्रीमियरच्या 3 दिवस आधीच त्याची आई नर्गीस यांचं निधन झालं होतं. संजय दत्तबाबतचे असेच अनेक खुलासे या सिनेमातून होणार आहेत. 

Web Title: Sanju new posters revealed by Rajkumar Hirani with unknown interesting facts