Video : "काय लावलंय सिडनाज सिडनाज?" सलमान खान भडकला; 'शहनाजने काय आता...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:22 AM2023-04-17T11:22:48+5:302023-04-17T11:24:27+5:30

'सिडनाज'च्या चाहत्यांना सलमान खानने झापले.

salman khan gets angry at sidnaaz fans says stop saying she has her own life ahead | Video : "काय लावलंय सिडनाज सिडनाज?" सलमान खान भडकला; 'शहनाजने काय आता...'

Video : "काय लावलंय सिडनाज सिडनाज?" सलमान खान भडकला; 'शहनाजने काय आता...'

googlenewsNext

'बिग बॉस' फेम अभिनेत्री शहनाझ गिल (Shehnaaz Gill) 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून सलमानसोबत बॉलिवूड पदार्पण करत आहे. शहनाझ म्हणलं की आपोआप सिद्धार्थ शुक्लाचं नाव येतंच. 2021 साली सिद्धार्थचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. यानंतर शहनाझ अक्षरश: कोसळली. आता ती दु:खातून सावरली आहे. मात्र सोशल मीडियावर अजूनही 'सिडनाज'चा जप सुरुच असतो. सिडनाजच्या याच चाहत्यांना आता सलमान खानने (Salman Khan) कडक शब्दात झापलं आहे.
 
'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीमने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सलमान खानने सिडनाजच्या चाहत्यांना झापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सलमान म्हणतो, 'सोशल मीडियावर शहनाजला सतत सिडनाज सिडनाज  म्हणलं जातं. सिद्धार्थ आता या जगात नाहीए.तो जिथे कुठे असेल त्यालाही असंच वाटत असेल की तिच्या आयुष्यात कोणीतरी यावं, तिचं लग्न व्हावं, मुलंबाळं व्हावीत पण हे सोशल मीडियावर कोणी आहेत जे सिडनाज सिडनाज करत असतात. आता काय आयुष्यभर ही अविवाहितच राहिल का? आणि हे जितके लोक सिडनाज सिडनाज करतात त्यातल्या एकाला जरी हिने पसंत केले तर तो लगेच म्हणेल हो मी तुझ्यासाठी आहे.' हे ऐकून सर्व हसतात.

सलमान पुढे म्हणतो, 'लोकांचं ऐकून नको मनाला पटतंय ते कर. आणि आयुष्यात पुढे जा'. सलमान खानचे हे शब्द ऐकताना शहनाज खूप भावूक झालेली दिसते. शहनाज आजही सिद्धार्थच्या आठवणीत दु:खी होते. मात्र आता ती स्वत:ला कामात व्यस्त ठेवत आहे. तसंच सलमान खाननेही या माध्यमातून तिला मोलाचा सल्ला दिला आहे.

Web Title: salman khan gets angry at sidnaaz fans says stop saying she has her own life ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.