'अमरावतीचा बॉडी बिल्डर' रोशन भजनकर आणि 'जुन्नरची वाघीण' दिव्या शिंदेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 22:24 IST2026-01-11T22:23:29+5:302026-01-11T22:24:26+5:30
अमरावतीचा बॉडी बिल्डर आणि जुन्नरची वाघीण बिग बॉस मराठी ६ च्या घरात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

'अमरावतीचा बॉडी बिल्डर' रोशन भजनकर आणि 'जुन्नरची वाघीण' दिव्या शिंदेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री
'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर कलर्स मराठीवर सुरु आहे. सर्वांना या नव्या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अशातच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच या नव्या सीझनमध्ये अमरावतीचा देशी बॉडी बिल्डर रोशन भजनकर आणि महाराष्ट्राची वाघीण
'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेला रोशन भजनकर हा कष्ट करुन कुटुंबाचं पोट भरणारा एक व्यायामपटू आहे. रोशन भजनकर हा गरीब घरातून पुढे आलेला एक मुलगा असून रोशनच्या मेहनतीचं रितेश देशमुखनेही कौतुक केलं आहे. रोशननंतर जुन्नरची फायरब्रँड असलेली दिव्या शिंदे ही 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दाखल झाली आहे. दिव्याने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कायम आवाज उठवला आहे. त्यामुळे तिला जुन्नरची फायरब्रँड आणि महाराष्ट्राची वाघीण असंही म्हणतात.
रोशनने घरी आल्यावर त्याची पत्नी, आई आणि मुलांचे आभार मानले. घरच्यांचं मला टीव्हीवर बघण्याचं स्वप्न पूर्ण झालं, अशा शब्दात रोशनने त्याच्या भावुक भावना व्यक्त केल्या. दिव्याने घरात आल्यावर रितेशचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण जागवली आहे. तिने रितेश आणि त्याच्या मेहनतीचंही कौतुक केलं आहे. रोशन आणि दिव्याची घरात एन्ट्री झाल्याने बिग बॉसच्या घरात धमाल दिसणार आहे.