रिंकू राजगुरूला या गोष्टींची वाटते भीती, अभिनेत्री म्हणाली - "त्याच्यामुळे माणूस म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:38 IST2025-12-22T16:35:46+5:302025-12-22T16:38:17+5:30

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा 'आशा' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Rinku Rajguru is afraid of these things, the actress said - ''Because of him, as a human being...'' | रिंकू राजगुरूला या गोष्टींची वाटते भीती, अभिनेत्री म्हणाली - "त्याच्यामुळे माणूस म्हणून..."

रिंकू राजगुरूला या गोष्टींची वाटते भीती, अभिनेत्री म्हणाली - "त्याच्यामुळे माणूस म्हणून..."

रिंकू राजगुरू मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'सैराट' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.  या चित्रपटातून तिला एका रात्रीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने आणखी काही मराठी सिनेमात काम केले. हिंदी वेबसीरिजमध्येही ती झळकली आहे. नुकताच तिचा आशा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिला काही गोष्टींची भीती वाटत असल्याचे सांगितले.

रिंकू राजगुरू लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ती म्हणाली की, आता खूप गोष्टींची भीती वाटते. विश्वास ठेवायची भीती वाटते. माणसं गमावण्याची भीती वाटते. तर एवढंच ऐकतोच ना आपण आता किती गोष्टी आजूबाजूला मुलींच्या बाबतीत असतील बातम्यांमध्ये असतील. साधारणपणे मी जेन झी आहे पण त्या टर्म्स कंडिशन्स सगळ्याच गोष्टी असतील. तर त्याच्यामुळे माणूस म्हणून पटकन कोणावरती विश्वास ठेवावा का ह्या गोष्टीची भीती वाटते आणि माणसं गमावण्याची मला भीती वाटतेच.


रिंकू राजगुरूचा आशा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका रिंकूने साकारली आहे.

या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

Web Title : रिंकू राजगुरू ने विश्वास और लोगों को खोने के बारे में अपने डर का खुलासा किया।

Web Summary : अभिनेत्री रिंकू राजगुरू, जो 'सैराट' के लिए जानी जाती हैं, ने हाल ही में एक साक्षात्कार में दूसरों पर विश्वास करने और लोगों को खोने के डर के बारे में अपनी चिंताएं साझा कीं। उन्होंने सुरक्षा के बारे में चिंताओं और वर्तमान घटनाओं के कारण लोगों पर आसानी से विश्वास करने की कठिनाई पर प्रकाश डाला।

Web Title : Rinku Rajguru reveals her fears about trust and losing people.

Web Summary : Actress Rinku Rajguru, known for 'Sairat,' shared her anxieties about trusting others and the fear of losing people in a recent interview. She highlighted concerns about safety and the difficulty of trusting people easily due to current events.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.