Loveyapa Movie Review: एकमेकांच्या अंतरंगात डोकावणारी युथफूल लव्हस्टोरी, जुनैद-खुशीची फ्रेश जोडी

By संजय घावरे | Updated: February 7, 2025 15:52 IST2025-02-07T15:52:03+5:302025-02-07T15:52:26+5:30

मोबाईलच्या विश्वात हरवलेल्या जेन झीचा एकमेकांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न सिनेमात पाहायला मिळतो. कसा आहे एकंदर सिनेमा वाचा

Loveyapa Movie Review starring junaid khan and khushi kapoor movie is about gen z | Loveyapa Movie Review: एकमेकांच्या अंतरंगात डोकावणारी युथफूल लव्हस्टोरी, जुनैद-खुशीची फ्रेश जोडी

Loveyapa Movie Review: एकमेकांच्या अंतरंगात डोकावणारी युथफूल लव्हस्टोरी, जुनैद-खुशीची फ्रेश जोडी

Release Date: February 07,2025Language: हिंदी
Cast: जुनैद खान, खुशी कपूर, आशुतोष राणा, तन्विका पार्लीकर, किकू शारदा, ग्रुशा कपूर
Producer: प्रदीप रंगनाथन, भावना तलवार, सृष्टी बहल, मधु मंटेनाDirector: अद्वैत चंदन
Duration: २ तास १८ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

दिग्दर्शक अद्वैत चंदनचा 'लव्हयापा' (Loveyapa) हा चित्रपट २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ 'लव्ह टुडे'चा रिमेक आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात असलेल्या रोझ डेला रिलीज झालेल्या या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) आणि श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) यांची जोडी आहे. मोबाईलच्या विश्वात हरवलेल्या जेन झीचा एकमेकांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न यात पाहायला मिळतो.

कथानक : गौरव-बानी यांची ही लव्हस्टोरी आहे. प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगणाऱ्या या जोडप्याच्या घरी दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत माहित नसते. कायम मोबाईलला चिकटलेल्या गौरवला त्याची आई सारखी ओरडत असते. गौरवची बहिण किरणचे लग्न लठ्ठ असलेल्या डेंटीस्ट अनुपमशी ठरते. दोघांच्या घरी त्यांच्या प्रेमाबाबत समजताच बानीचे वडील गौरवला घरी बोलावतात. एकमेकांवरील विश्वास व प्रेम सिद्ध करण्यासाठी दोघांना २४ तासांसाठी मोबाईलची अदलाबदली करायला सांगतात. त्यानंतर कथेत नाट्यमय वळणे येतात.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची पटकथा तरुणाईला आवडणारी असून, त्यांच्या आवडी-निवडी जपणारी आहे. संवादही जेन झीच्या शैलीतील आहेत. चित्रपटातील संवाद अर्थपूर्ण असून, काही ठिकाणी अंतर्मुख करतात. सुरुवातीपासूनच पटकथा वेगात पुढे सरकल्याने कमी वेळेत बरेच मुद्दे मांडणे शक्य झाले आहे. या चित्रपटात नायक-नायिकेचा लव्ह आणि बहिण-भावोजी अरेंज मॅरेज असे दोन ट्रॅक्स आहेत. दोन्ही ट्रॅक्सना जोडणारा मोबाईल हा समान धागा आहे. गीत-संगीत ठीक आहे. सिनेमॅटोग्राफी आणि ग्राफिक्स छान आहेत.

अभिनय : जुनैदने पुन्हा एकदा खूप छान काम केले आहे. 'महाराज'मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा अतिशय वेगळ्या असलेल्या गौरवला त्याने अचूक न्याय दिला आहे. स्टारकिड्सच्या चेहऱ्यावरील अॅटीट्यूड खुशी कपूरला पाहिल्यावर सहजपणे जाणवतो. तिने अभिनय ठिक केला असला तरी शरीरात लवचीकपणा आणण्याची गरज आहे. शुद्ध हिंदी बोलण्यात तरबेज असलेल्या आशुतोष राणांनी छान काम केले आहे. किकू शारदाचे कॅरेक्टर लठ्ठ व्यक्तींची व्यथा अचूकपणे मांडते. तन्विकाने त्याला चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : गीत-संगीत

थोडक्यात काय तर काय तर मोबाईलची अदलाबदली झाल्यास काय घडू शकते हे सांगणारी जेन झीची ही हलकी फुलकी लव्हस्टोरी एकदा पाहायला हवी.

Web Title: Loveyapa Movie Review starring junaid khan and khushi kapoor movie is about gen z

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.