या वीकेंडला ओटीटीसह थिएटरमध्ये पाहायला मिळणार 'हे' दमदार चित्रपट अन् सिरीज, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:09 IST2025-05-29T13:09:34+5:302025-05-29T13:09:52+5:30

या वीकेंडला काय पाहता येणार? कोणत्या वेब सिरीज व चित्रपट भेटीला येणार, घ्या जाणून

Release This Friday Kankhajura Andhar Maya Zee5 Karate Kid: Legends Pankaj Tripathi Criminal Justice Season 4 To Lost In Starlight | या वीकेंडला ओटीटीसह थिएटरमध्ये पाहायला मिळणार 'हे' दमदार चित्रपट अन् सिरीज, पाहा यादी

या वीकेंडला ओटीटीसह थिएटरमध्ये पाहायला मिळणार 'हे' दमदार चित्रपट अन् सिरीज, पाहा यादी

Friday Release:  शुक्रवार हा दिवस मनोरंजन विश्वासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. कारण, याच दिवशी बहुतांश नवे चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.  मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील शुक्रवार धमाकेदार मनोरंजनाचा वार ठरणार आहे. उद्या प्रेक्षकांना थिएटरसह ओटीटीवरही अ‍ॅक्शन, कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा अशी मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

जर तुम्ही हॉलिवूड आणि हाँगकाँगचे सुपरस्टार जॅकी चॅनचे चाहते असाल तर हा शुक्रवार तुमच्यासाठी खूप खास आहे. बऱ्याच काळानंतर तुम्हाला मोठ्या पडद्यावर जॅकीच्या अ‍ॅक्शनची जादू पाहायला मिळेल. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कराटे किड - लेजेंड्स' (Karate Kid: Legends) या शुक्रवारी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण यांनी डब केलं आहे.

या आठवड्यात तुम्हाला कोर्टरूम ड्रामा देखील पाहायला मिळणार आहे. कारण, पंकज त्रिपाठी यांची बहुचर्चित वेब सिरीज 'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice)चा चौथा सीझन आज गुरुवारीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर हा सीझन तुम्ही पाहून शकता. आतापर्यंत या सिरीजचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि तिन्ही भागांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे.

उद्या SonyLIV वर 'कानखजुरा' (Kankhajura) वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज मूळ इझ्रायली वेबसिरीज 'Magpie' वर आधारित आहे. या मालिकेत मोहित रैना, रोशन मॅथ्यूज, सारा जेन डायस, महेश शेट्टी, निनाद कामत, त्रिनेत्रा हलदार, हीबा शाह आणि उषा नाडकर्णी यांसारखे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत. ही सिरीज पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

हॉरर थ्रिलर पाहणाऱ्यांना प्रेक्षकांचीदेखील या शुक्रवारी निराशा होणार नाही. कारण उद्या ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर 'अंधार माया' (Andhar Maya) नावाची हॉरर थ्रिलर वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. 

अनेकांना अ‍ॅनिमेटेड फिल्म पाहायला आवडतात. कारण अ‍ॅनिमे कॅरेक्टर्स हे दिसायला कार्टून सारखे असले तरी ते प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतात. तर लॉस्ट इन स्टारलाईट ( Lost in Starlight) मध्ये तुम्हाला अ‍ॅनिमेटेड आणि कोरियन ड्रामाचे मिश्रण पाहायला मिळेल. उद्या शुक्रवारी ३० मे रोजी प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम होईल.

Web Title: Release This Friday Kankhajura Andhar Maya Zee5 Karate Kid: Legends Pankaj Tripathi Criminal Justice Season 4 To Lost In Starlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.