PICS : रवीना टंडन खूश्श, मुलांनी ‘KGF 2’साठी दिली खास सरप्राईज पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 18:31 IST2022-04-24T18:31:13+5:302022-04-24T18:31:39+5:30
KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’ चं यश एकट्या यशचं नाही तर या यशात बॉलिवूडच्या काही कलाकारांचंही मोठ योगदान आहे. संजय दत्त आणि रवीना टंडन यांनी ‘केजीएफ 2’मध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

PICS : रवीना टंडन खूश्श, मुलांनी ‘KGF 2’साठी दिली खास सरप्राईज पार्टी
साऊथ सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ ( KGF 2)बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. यशवर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण चित्रपटाचं यश एकट्या यशचं नाही तर या यशात बॉलिवूडच्या काही कलाकारांचंही मोठ योगदान आहे. संजय दत्त आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांनी ‘केजीएफ 2’मध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. साहजिकच दोन्ही स्टार सध्या खूश्श आहेत. रवीनाचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे, ‘केजीएफ 2’चं यश आणि दुसरं म्हणजे, मुलांकडून मिळालेली सरप्राईज पार्टी.
होय, रविवारी रवीनाच्या दोन्ही मुलांनी तिला खास सरप्राईज पार्टी दिली. मुलांसोबत रवीनाने ‘केजीएफ 2’चा सक्सेस सेलिब्रेट केला. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात रवीना दोन्ही मुलांसोबत दिसतेय. एका फोटोत तिने पती अनिल थडाणीसोबत पोझ दिली आहे.
दहा दिवसांत ओलांडला 800 कोटींचा टप्पा
‘केजीएफ 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सलग दुस-या आठवड्यातही हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये जवळपास 750 कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘केजीएफ 2’ हा कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एकूण 280.19 कोटींची कमाई केली आहे.