लग्नाची बातमी खरी? साखरपुड्याच्या चर्चेनंतर शुभेच्छा ऐकून रश्मिका मंदाना लाजली, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 13:15 IST2025-10-19T12:43:13+5:302025-10-19T13:15:18+5:30
रश्मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नाची बातमी खरी? साखरपुड्याच्या चर्चेनंतर शुभेच्छा ऐकून रश्मिका मंदाना लाजली, Video व्हायरल
Rashmika Mandanna On Her Engagement: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी "थामा" (Thama) चित्रपटामुळे चर्चेत आहे. "थामा" हा २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटासोबतच रश्मिका सध्या तिच्या साखरपुड्यामूळे चर्चेत आहे. रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सध्या सगळीकडून रश्मिका व विजय दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच रश्मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'थामा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रश्मिकाने 'गलटा प्लस'ला मुलाखत दिली. यावेळी होस्टने तिचं अभिनंदन केले. अचानक मिळालेल्या या अभिनंदनामुळे रश्मिका थोडी कावरीबावरी झाली आणि लाजताना दिसली. यावर होस्टने स्पष्ट केले की तो तिच्या नवीन परफ्यूम लाइनबद्दल अभिनंदन करत आहे. रश्मिकाने यावर त्वरित हसत उत्तर दिले, "खरं तर, खूप काही घडत आहे. म्हणून मी तुमच्या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करते..." अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. रश्मिकाच्या या उत्तरामुळे तिच्या आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी "गीता गोविंदम" आणि त्यानंतर "डियर कॉम्रेड" या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती आणि याच दरम्यान त्यांची जवळीक वाढली होती. अलीकडेच त्यांच्या साखरपुड्याची बातमी आल्यानंतर विजयच्या हातात अंगठी दिसली होती. तसेच, रश्मिकाने स्वतः एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिच्याही बोटात हिऱ्याची अंगठी दिसली होती.
रश्मिका मंदाना आता तिच्या "थामा" या हॉरर कॉमेडी चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी देखील मुख्य भूमिकेत आहे. 'थामा' दिवाळीच्या मुहुर्तावर २१ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.