‘83’ फ्लॉप होऊ नये म्हणून रणवीर सिंगने घेतला मोठा निर्णय, मेकर्सही होणार खूश...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:36 PM2021-12-29T15:36:58+5:302021-12-29T15:37:38+5:30

रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘83’ (Film 83) या चित्रपटाकडून मेकर्स, ट्रेड अ‍ॅनालिस्ट सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण तूर्तास तरी या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.

Ranveer Singh To Suffer A Cut In His Pending Fees Due To The 83 Low Box Office Numbers? | ‘83’ फ्लॉप होऊ नये म्हणून रणवीर सिंगने घेतला मोठा निर्णय, मेकर्सही होणार खूश...

‘83’ फ्लॉप होऊ नये म्हणून रणवीर सिंगने घेतला मोठा निर्णय, मेकर्सही होणार खूश...

googlenewsNext

रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘83’ (Film 83) या चित्रपटाकडून मेकर्स, ट्रेड अ‍ॅनालिस्ट सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण तूर्तास तरी या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. रिलीज होण्याआधी ‘83’ची चांगलीच हवा होती. पण बॉक्स ऑफिसवर फार काही जादू दिसली नाही. गेल्या 5 दिवसांत चित्रपटाने फक्त 60 ते 70 कोटींचा बिझनेस केला आहे. 270 कोटी रूपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली पाहून वेगवेगळ्या चर्चाही कानावर येऊ लागल्या आहेत. मेकर्सच अपयशाचं खापर एकमेकांच्या माथी फोडू पाहत आहेत.

कबीर खानने डॉक्युमेंट्री स्टाईलमध्ये सिनेमा बनवला आणि म्हणून प्रेक्षक त्याच्याशी कनेक्ट करू शकले नाहीत, असंही म्हटलं जातंय. आता कारण काहीही असो, पण तूर्तास तरी ‘83’ तोट्यात गेला,असं म्हणायला हरकत नाही. आता हा तोटा भरून काढण्यासाठी रणवीर सिंग म्हणे पुढे सरसावला आहे.

होय, ‘83’च्या मेकर्सनी अद्याप रणवीर सिंगला पूर्ण पैसे दिलेले नाहीत. आता  उर्वरित मानधन न घेण्याचा निर्णय रणवीरने घेतल्याची चर्चा आहे. यामुळे तोटा काहीसा भरून निघेल, असा यामागचा त्याचा विचार आहे. ‘83’वर मेकर्सनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. कारण हा सिनेमा चांगला बिझनेस करेल, अशी अपेक्षा मेकर्सला होती. पण असं काहीही घडलं नाही. यामुळे रणवीरने आपल्या मानधनाच्या रकमेकवर पाणी सोडल्याचं कळतंय. (Ranveer not taking full fees for 83)

‘83’कडे प्रेक्षक फिरकलेच नाहीत, यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. काहींनी यासाठी कबीर खानला दोष दिला आहे तर काहींनी प्रमोशनला. काहींच्या मते, कोरोनाचा वाढता प्रकोप हाही यासाठी कारणीभूत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे देशाच्या अनेक राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे ‘83’चे अनेक नाईट शो ठप्प पडले आहेत. दिल्लीत  चित्रपटगृह पुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. दिल्लीत बॉलिवूड चित्रपट चांगली कमाई करतात. याचा फटका ‘83’ला बसल्याचं मानलं जातेय.

Web Title: Ranveer Singh To Suffer A Cut In His Pending Fees Due To The 83 Low Box Office Numbers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.