'डॉन ३'मध्ये कियाराच्या जागी दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री , रणवीरची 'जंगली बिल्ली' बनणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 10:43 IST2025-04-16T10:43:10+5:302025-04-16T10:43:38+5:30
'डॉन ३' सिनेमाची सध्या चांगली उत्सुकता असून एका मराठमोळ्या अभिनेत्रीची थेट मुख्य भूमिकेसाठी वर्णी लागली आहे (don 3)

'डॉन ३'मध्ये कियाराच्या जागी दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री , रणवीरची 'जंगली बिल्ली' बनणार
'डॉन ३' सिनेमाची (don 3 movie) गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलीच चर्चा आहे. रणवीर सिंग 'डॉन ३' सिनेमात शाहरुख खानच्या (shahrukh khan) जागी दिसणार आहे. 'डॉन ३' सिनेमाचा घोषणा टीझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरमध्ये रणवीर सिंगची खास झलक बघण्यात आली. 'डॉन ३' सिनेमात कियारा अडवाणी (kiara advani) रणवीरसोबत (ranveer singh) झळकणार हे निश्चित होतं. परंतु सध्या प्रेग्नंसीमुळे कियाराला 'डॉन ३' सोडावा लागला. कियाराच्या जागी 'डॉन ३'मध्ये कोण दिसणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याविषयी मोठं नाव समोर आलंय. रणवीर सिंगसोबत 'डॉन ३'मध्ये अभिनेत्री म्हणून कोण दिसणार, जाणून घ्या.
'डॉन ३'मध्ये झळकणार ही अभिनेत्री
मिडिया रिपोर्टनुसार,'डॉन ३'च्या मेकर्सनी कियाराच्या जागी एका दुसऱ्या अभिनेत्रीच्या नावावर शिक्का मारला आहे. ही अभिनेत्री आहे शर्वरी वाघ. 'डॉन ३'साठी कियारानंतर अनेक अभिनेत्रींच्या नावाचा विचार केला जात होता. परंतु सिनेमाच्या टीमने शर्वरीचं नाव फायनल केलंय. शर्वरी सुद्धा 'डॉन ३'मध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचं समजतंय.
यानिमित्ताने 'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघ पहिल्यांदाच इतक्या मोठ्या बजेटच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. 'डॉन ३'चं शूटिंग २०२५ सुरु होणार आहे. शर्वरी वाघ या सिनेमात रणवीरची जंगली बिल्ली म्हणून दिसणार आहे.
शर्वरीचं वर्कफ्रंट
सध्या शर्वरी तिच्या आगामी अल्फा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात शर्वरी अभिनेत्री आलिया भटसोबत झळकणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगनंतर शर्वरी 'डॉन ३'चं शूटिंग करणार आहे. २०२४ मध्ये 'मुंज्या' या सिनेमातून शर्वरीने उत्कृष्ट अभिनय केला. या सिनेमानंतर शर्वरीकडे विविध ब्रँड्स आणि जाहिरातींच्या ऑफर्स आल्या. याशिवाय ओटीटीवर 'महाराजा' या सिनेमात शर्वरीने अभिनेता जुनैद खानसोबत काम केलं.