पोलीस चौकीत राजा-रानीची जोडी; रणजीत ढालेपाटील पुन्हा होणार ACP
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:18 PM2021-10-22T16:18:29+5:302021-10-22T16:19:17+5:30
Raja rani chi ga jodi: लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सस्पेंड झालेला रणजीत ढालेपाटील पुन्हा एकदा त्याच्या वर्दीमध्ये दिसणार आहे.
![raja rani chi ga jodi new twist latest episode ranjeet dhale patil new acp | पोलीस चौकीत राजा-रानीची जोडी; रणजीत ढालेपाटील पुन्हा होणार ACP raja rani chi ga jodi new twist latest episode ranjeet dhale patil new acp | पोलीस चौकीत राजा-रानीची जोडी; रणजीत ढालेपाटील पुन्हा होणार ACP](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/sanju_202110709323.jpg)
पोलीस चौकीत राजा-रानीची जोडी; रणजीत ढालेपाटील पुन्हा होणार ACP
छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे राजा रानीची गं जोडी (raja rani chi ga jodi). या मालिकेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे संजू आणि रणजीत ढालेपाटील (sanjeevani ranjeet dhale patil ) या दोघांनाही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अवखळ, अल्लड असलेली संजू आता पीएसआय झाली असून घरची आणि कामाची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. यामध्येच आता संजूला एक गोड बातमी मिळणार आहे.
लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सस्पेंड झालेला रणजीत ढालेपाटील पुन्हा एकदा त्याच्या वर्दीमध्ये दिसणार आहे. कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तो पोलिस चौकीमध्ये ACP रणजीत ढाले-पाटील म्हणून जाणार आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट संजूलादेखील माहित नसून तिच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का असणार आहे.
रणजीतला त्याची वर्दी परत मिळणार आहे असंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसत आहे. कारण या प्रोमोमध्ये नवीन एसीपी साहेबांची एंट्री दाखवण्यात आली आहे. ते एसीपी म्हणजे रणजीत ढालेपाटील आहे. रणजीतला वर्दीत पाहून संजूच्या तोंडून आपोआप फौजदार असं निघतं आणि तिच्या खास शैलीत TOKKKK करते.
दरम्यान, या मालिकेत अनेक रंजक वळण येत असतानाच हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता रणजीतला कशा प्रकारे त्याची वर्दी परत मिळाली हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.