राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 01:56 PM2023-11-21T13:56:53+5:302023-11-21T13:59:52+5:30

अभिनेता राहुल वैद्यने बायको दिशासाठी एक खास पोस्ट केली असून तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

Rahul Vaidya pens a heartfelt note for wife Disha Parmar | राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...'

राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...'

अभिनेता राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार ही जोडी कायमच चर्चेत असते. दोघांचीही जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. राहुल आणि दिशा  सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत. नुकतेच दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सध्या हे जोडपं पालकत्वाचा आनंद घेत आहे. राहुल वैद्य हा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतो. अशातच त्याने बायको दिशासाठी एक खास पोस्ट केली असून तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

 राहुलने दिशाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशाचा गरोदरपणापासून मातृत्वापर्यंतचा प्रवास पाहायला मिळत आहे. राहुल वैद्यने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी ऐकले होते की गरोदरपणात मूड स्विंग होतो. पण गरोदर असताना दिशा शांत होती. जास्त मूड-स्विंग झाले नाही. यामुळे मला जवळजवळ असं वाटलं की दिशा गरोदर नाही. तुझ्या शरीरात मोठे बदल झाले'.

पुढे तो म्हणाला, ' गरोदरपणात झालेल्या त्रासाचा तू माझ्यावर किंवा घरातल्या इतर कोणावरही परिणाम होऊ दिला नाही.  मला आठवते की जवळजवळ ६ महिने तुला झोपण्यात अडचण येत होती. मी कायमच तुझ्यावर प्रेम केले आणि आदर केला आहे. पण तुझ्या गरोदरपणानंतर ते अनेक पटीने वाढले आहे. सगळ्या गोष्टीसाठी खूप-खूप धन्यवाद. माझ तुझ्यावर खूप-खूप प्रेम आहे'.

राहुल आणि मॉडेल-अभिनेत्री दिशा परमार लग्नापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. राहुल जेव्हा 'बिग बॉस १४' मध्ये होता तेव्हा त्याने दिशाला प्रपोज केले होते. दोघांनी १६ जुलै २०२१ रोजी लग्न केले. मुंबईमध्ये अत्यंत शाही पद्धतीने राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा विवाहसोहळा पार पडला. अनेक मोठे कलाकार या लग्नसोहळ्यास उपस्थित होते.

Web Title: Rahul Vaidya pens a heartfelt note for wife Disha Parmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.