4 अफेअर्स अन् मोडलेला संसार! लव्हलाइफमुळे चर्चेत आलेला 'आशिकी'फेम अभिनेता आता जगतोय एकाकी जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 07:19 PM2023-04-16T19:19:19+5:302023-04-16T19:20:34+5:30

Rahul Roy: राहुल रॉयचं नाव पूजा भट्ट, मनिषा कोईराला या दिग्गज अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं होतं.

rahul roy aashiqui fame actor disaster love life 4 relationships and one broken marriage | 4 अफेअर्स अन् मोडलेला संसार! लव्हलाइफमुळे चर्चेत आलेला 'आशिकी'फेम अभिनेता आता जगतोय एकाकी जीवन

4 अफेअर्स अन् मोडलेला संसार! लव्हलाइफमुळे चर्चेत आलेला 'आशिकी'फेम अभिनेता आता जगतोय एकाकी जीवन

googlenewsNext

९० चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे राहुल रॉय (Rahul Roy). आशिकी या सिनेमातून त्याने अफलातून लोकप्रियता मिळवली. या सिनेमामुळे रातोरात स्टार झालेल्या या अभिनेत्याचा फिमेल फॅनफॉलोअरही जबरदस्त वाढला होता. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा चाहत्यांचा प्रयत्न असायचा. विशेष म्हणजे या अभिनेत्याच्या फिल्मी लाइफमध्ये जितके चढउतार आले. तितकेच त्याच्या पर्सनल आयुष्यातही आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे ४ अफेअर्स, १ लग्न असं करुनही हा अभिनेता आज एकाकी जीवन जगत आहे.

राहुल रॉय याचं कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. त्यामुळे त्याची अफेअर्स त्या काळी चांगलेच गाजले. यात राहुलने महेश भट्टची लेक पूजा भट्ट (Pooja Bhatt) हिला डेट केलं होतं. राहुल आणि पूजाने 'जानम', 'जुनून,फिर तेरी कहानी याद आयी' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र, या दोघांनी त्यांचं नातं कधीच जाहीरपणे मान्य केलं नाही.

पूजा भट्टनंतर त्याचं नाव मनिषा कोईरालासोबत जोडलं गेलं होतं. या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं. मात्र, नात्यापेक्षा करिअरला महत्त्व देत या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. राहुल रॉयचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री सुमन रंगनाथन हिच्यासोबतही जोडलं गेलं होतं.
राहुल आणि सुमन ही जोडी ३ वर्ष रिलेशनमध्ये होती. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले. आयुष्यात ३ ब्रेकअप सहन केल्यानंतर त्याने २००० मध्ये मॉडेल

राजलक्ष्मीसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचा संसार १४ वर्ष सुखाने झाला. मात्र, त्यानंतर या नात्यात वितुष्ट आलं. राजलक्ष्मीला विदेशात सेटल व्हायचं. तर, राहुल देश सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे ते विभक्त झालं.

दरम्यान,  राजलक्ष्मीला घटस्फोट दिल्यानंतर त्याने २०१६ मध्ये सुपरमॉडेल साधना सिंहला डेट करण्यास सुरुवात केली. मात्र, हे नातंही फार काळ टिकलं नाही. परिणामी, आज आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर राहुल रॉय एकाकी जीवन जगत आहे.
 

Web Title: rahul roy aashiqui fame actor disaster love life 4 relationships and one broken marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.