आलिया भटच्या 'राजी' ने रविवारी केली इतकी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 16:54 IST2018-05-14T16:53:09+5:302018-05-14T16:54:06+5:30
जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'राजी' या सिनेमाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. खासकरुन या सिनेमातील अभिनेत्री आलिया भटचं भरभरुन कौतुक केलं जातंय.

आलिया भटच्या 'राजी' ने रविवारी केली इतकी कमाई
मुंबई : जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'राजी' या सिनेमाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. खासकरुन या सिनेमातील अभिनेत्री आलिया भटचं भरभरुन कौतुक केलं जातंय. सोबतच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईबाबतही घोडदौड करत आहे.
बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या या सिनेमाने रविवारी 14.11 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. यानुसार या सिनेमाची विकेंडची कमाई 32.94 कोटी रुपये इतकी झाली आहे.
पहिल्या दिवशी राजी या सिनेमाने 7.53 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या सिनेमाने चक्क 50 टक्के अधिक म्हणजे 11.30 टक्के कमाई केली. हा सिनेमा 2018 मध्ये ओपनिंग डेला सर्वात जास्त कमाई करणारा पाचवा सिनेमा ठरला आहे.
'राजी' या सिनेमाची कथा 1971 मध्ये झालेल्या इंडो-जाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. ज्यात एक भारतीय मुलगी पाकिस्तानी आर्मी ऑफिसरसोबत लग्न करुन देशासाठी गुप्तहेर म्हणून काम करते.
या सिनेमात आलिया भट आणि विकी कौशलसह जयदीप अहलावत, शिशिर शर्मा, रजित कपूर, सोनी राजदान, आरिफ जकारिया आणि अमृता खानविलकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.