सलमानच्या 'भारत'मध्ये काम करण्यासाठी प्रियंकाने घेतलं इतकं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 13:42 IST2018-06-18T13:41:17+5:302018-06-18T13:42:07+5:30
सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात प्रियंका दिसणार आहे.

सलमानच्या 'भारत'मध्ये काम करण्यासाठी प्रियंकाने घेतलं इतकं मानधन
मुंबई : क्वांटिको या सीरिजच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये धमाका करणारी बॉलिवूडची देसी गर्ल लवकरच हिंदी सिनेमात दिसणार आहे. बऱ्याच वर्षांनी प्रियंका बॉलिवूड सिनेमात दिसणार असल्याने तिचे चाहतेही या सिनेमाची वाट बघत आहेत. सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात प्रियंका दिसणार आहे.
सध्या प्रियंका ही हॉलिवूडमध्ये आहे. एका अमेरिकन गायकाला डेट करत असल्यानेही ती सध्या जोरदार चर्चेत आहे. आता तिने 'भारत' या सिनेमासाठी किती मानधन घेतलं याची चर्चा होत आहे. त्यासोबतच प्रियंका ही हृतिक रोशनच्या क्रिश सीरिजच्या कृशृ4 मध्येही दिसण्याची शक्यता आहे.
'भारत' या सिनेमासाठी प्रियंकाने तब्बल 12 कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केली आहे. आणि हे तिला मिळाल्याची माहिती आहे. कारण तिने सिनेमा आधीच साइन केलाय. एका सिनेमासाठी 12 कोटी रुपयांचं मानधन घेणारी प्रियंका ही बॉलिवूडची दुसरी अभिनेत्री असेल. कारण याआधी दीपिका पादुकोणने पद्मावतसाठी 12 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.