बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियदर्शनीला मागावी लागली माफी; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 15:38 IST2023-06-25T15:37:34+5:302023-06-25T15:38:19+5:30

Priyadarshini indalkar: प्रियदर्शनीने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे.

priyadarshini indalkar apologize to fans on her birthday maharashtrachi hasyajatra | बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियदर्शनीला मागावी लागली माफी; कारण आलं समोर

बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियदर्शनीला मागावी लागली माफी; कारण आलं समोर

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. हा कार्यक्रम सध्या बंद आहे. त्यामुळे चाहते या कार्यक्रमाला प्रचंड मिस करत आहेत. परंतु, या कार्यक्रमातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अलिकडेच या कार्यक्रमातील प्रिदर्शनी इंदलकर (priyadarshini indalkar) हिने तिचा वाढदिवस साजरा केला. मात्र, या बर्थ डे सेलिब्रेशननंतर तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांची माफी मागितली.

प्रियदर्शनीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रियदर्शनीने मोठ्या थाटात तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. मात्र, हे सेलिब्रेशन झाल्यानंतर तिने जाहीरपणे चाहत्यांची माफी मागितली.

प्रियदर्शनीने का मागितली माफी?

सध्याच्या घडीला प्रियदर्शनीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे चाहते सतत तिच्या पोस्टची, तिला भेटण्यासाठी वाट पाहत असतात. यात तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छांचा रिप्लाय प्रियदर्शनी देऊ शकली नाही. त्यामुळे तिने माफी मागितली आहे.

काय म्हणाली प्रियदर्शनी?

19.06.23.. मी माझ्या प्रियजनांसोबत होते! माझे दोन्ही कुटुंब! मी वाढदिवसाच्या दिवशी कामात बिझी होते ही एक चांगली गोष्ट आहे. पण, मी सगळ्या चाहत्यांची माफी मागते. मला तुमच्या शुभेच्छांना प्रतिक्रिया देता आली नाही. पण, सगळ्याच प्लॅटफॉर्मवरुन तुमचं भरपूर प्रेम मिळालं. हा दिवस जबरदस्त गेला. गेल्या वर्षी मला खूप नवीन गोष्टी, नवे लोक आणि नवीन उपक्रम करता आले. आता अधिक जबाबदाऱ्या घेऊन या वर्षात जात आहे. मला खात्री आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी चांगलं काम करत राहीन. मी युनिव्हर्सची आभारी आहे! या वर्षाला सकारात्मकतेने पाहत आहे" , असं प्रियदर्शनीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

Web Title: priyadarshini indalkar apologize to fans on her birthday maharashtrachi hasyajatra