तिच्या नजरेनं अन् हास्यानं तरुणाई घायाळ; फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 13:39 IST2018-02-13T12:23:21+5:302018-02-13T13:39:53+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे फेमस झालेल्या मल्याळम सिनेमातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Priya Prakash Varrier 3rd celebrity in the world instagram record | तिच्या नजरेनं अन् हास्यानं तरुणाई घायाळ; फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरात

तिच्या नजरेनं अन् हास्यानं तरुणाई घायाळ; फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरात

मुंबई - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे फेमस झालेल्या मल्याळम सिनेमातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. केवळ एका दिवसात कोट्यवधींच्या संख्येत प्रिया प्रकाशच्या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले आहेत. तर दुसरीकडे, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्यादेखील गतीनं वाढतेच आहे. 

इन्स्टाग्रामवर प्रियानं अनेक दिग्गजांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रिया प्रकाश वारियरला एका दिवसात तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे.  यासहीत सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो होणा-या सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया आता अमेरिकेची मॉडेल काइली जेनर आणि फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत पोहोचली आहे.  जेनर आणि ख्रिस्तियानो या दोघांच्याही नावावर केवळ एका दिवसात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्संची संख्या वाढल्याचा रेकॉर्ड आहे. अमेरिकीची मॉडेल काइली जेनरला एक दिवसात 8 लाखांहून अधिक तर ख्रिस्तियानो रोनाल्डोला एक दिवसात साडेसहा लाख लोकांनी इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.  

दरम्यान, प्रिया प्रकाश वारियर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.  नजरेनं घायाळ करणारे बाण सोडणारी  व्हिडीओतील ही तरुणी मल्याळम सिनेमातील अभिनेत्री आहे. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमुळे सध्या देशभरात तिचीच चर्चा सुरू आहे. प्रियाचा आगामी सिनेमा 'ओरू अदार लव्ह’ मधील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्याचा हा व्हिडीओ आहे. हे गाणं शान रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. 26 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये डोळ्यांच्या हावभावांतून आपलं प्रेम व्यक्त करताना ती दिसतेय. 

काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये शाळकरी मुलांमधील प्रेमाचे दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रिया डोळ्यांच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. तिच्या या अदा अगदी कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सोशल मीडियावर प्रियाच्या सौंदर्याची प्रचंड स्तुती केली जात आहे. प्रिया ही केरळमधील त्रिशूर येथील राहणारी आहे. तिला डान्स आणि फिरण्याची आवड आहे. दरम्यान प्रियाचा हा पहिलाच सिनेमा असून येत्या 3 मार्चला सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रिया या व्हायरल व्हिडीओमुळे भलतीच प्रसिद्ध झाली आहे.  
 

Web Title: Priya Prakash Varrier 3rd celebrity in the world instagram record