सत्य घटनांवर आधारित आहेत 'या' टॉप ५ वेबसीरिज, एकदा पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:14 IST2025-07-29T18:51:12+5:302025-07-29T19:14:05+5:30
तुम्ही जर या वेबसीरिज पाहिल्या नसतील तर लगेचच पाहा.

ओटीटी (OTT) विश्वात विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहेत. चित्रपट पाहण्यापेक्षा वेबसीरिज पाहणारा मोठा वर्ग आहे. कोरोनानंतर घरबसल्या वेबसीरिज पाहायला प्रेक्षकांना आवडतं.
सत्य घटनांवर आधारित अशा काही वेबसीरिज आहेत, ज्या केवळ थरारकच नाहीत, तर विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. जर तुम्हाला वास्तवदर्शी कथा पाहण्याची आवड असेल तर तुम्ही या काही टॉप वेबसीरिज एकदा नक्की पाहाव्यात!
या यादीत पहिल्या क्रमांवर आहे भौकाल (Bhaukaal). ही वेबसीरिज आयपीएस अधिकारी नवनीत सिकेरा यांच्या जीवनावर आधारित आहे. ही वेबसीरिज उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष दाखवते. तुम्ही एमएक्स प्लेअरवर ही वेबसीरिज पाहू शकता. मोहित रैना, अभिमन्यू सिंह, सिद्धांत कपूर, बिदिता बाग, गुल्की जोशी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत
विजय वर्माची 'IC 814: द कंधार हायजॅक' ही वेबसीरिज एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. तुम्ही ती ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहू शकता. ही घटना २४ डिसेंबर १९९९ रोजी घडली, जेव्हा दहशतवाद्यांनी काठमांडू येथून दिल्लीला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान (IC 814) अपहरण केले आणि ते कंधार येथे नेले.
या यादीत स्कूपचे (Scoop) नाव देखील आहे. पोलीस, अंडरवर्ल्ड, पत्रकार यांच्याभोवती या वेब सीरिजची कथा फिरते. सहा एपिसोडची असलेली वेब सीरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरली आहे. हंसल मेहता दिग्दर्शित ही वेबसीरिज तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहू शकता.
'रंगबाज' (Rangbaaz) ही सीरिज गँगस्टर श्री प्रकाश शुक्लाच्या जीवनावर आधारित आहे. त्याच वेळी, या सीरिजचा दुसरा सीझन राजस्थानचा गँगस्टर आनंदपाल सिंगच्या जीवनावर आधारित आहे. त्याचा तिसरा सीझन रंगबाज डर की राजनीती बिहारच्या गँगस्टर राजवटीवर आधारित आहे.
'आखरी सच' (Aakhri Sach) ही वेबसीरिज तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. 'आखरी सच' वेबसीरिजची कथा खूप आवडली गेली. जर तुम्ही ती अजून पाहिली नसेल तर तुम्ही ती OTT वर पाहू शकता.