रोमान्स, सस्पेन्स ते ड्रामा! डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी, काय पाहाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:08 IST2025-12-29T13:55:29+5:302025-12-29T14:08:28+5:30

२०२५ वर्ष संपत आहे. पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२६ च्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज आहोत. डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर रोमान्स, सुपरनॅचरल थ्रिलर ते कोर्टरुम ड्रामा अशी मेजवानी मिळणार आहे.

ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय सीरिज 'स्ट्रेंजर थिंग्स'चा सीझन ५ काही दिवसांपूर्वीच आलाय. या सीरिजचे चाहते आता शेवटचा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत जो ३१ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येणार आहे.

हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांसाठी हा महिनाअखेर एक कोर्टरुम ड्रामा येत आहे. यामी गौतम आणि इमरान हाश्मीचा 'हक' सिनेमा २ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. शाह बानो केसवर आधारित या सिनेमामध्ये यामी आणि इमरानच्या अभिनयाची खूप स्तुती झाली आहे.

मल्याळम सिनेमाच्या चाहत्यांसाठी ३१ डिसेंबर रोजी एक मिस्ट्री थ्रिलर सिनेमा येत आहे. 'एको' सिनेमाचं नाव आहे. डॉग ब्रीडर कुरियाचन(सौरभ सचदेवा) बेपत्ता होतो. त्याचा भूतकाळ, मलेशियाई श्वान आणि नेवीसोबतचं त्याचं कनेक्सन असे अनेक सस्पेन्स सिनेमात आहेत.

रोमँटिक कॉमेडी चित्रपट पाहायचा असेल तर १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक हलका फुलका सिनेमा येत आहे. 'लव्ह फ्रॉम 9 टू 5' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. ग्रेसिएला आणि मॅटियोची ही गोष्ट आहे. दोघंही वन नाईट स्टँड करतात. नंतर त्यांना समजतं की दोघंही एकाच अंडरवियर कंरनीच्या सीईओ पोस्टसाठी स्पर्धेत आहेत. यानंतर त्यांच्या नात्याचं काय होतं ते पाहायला मजा येते.

टीएनएज वयोगटासाठी खास 'फॉलो माय व्हॉइस' हा स्पॅनिश ड्रामा येत आहे. २ जानेवारी रोजी एमेझॉन प्राईमवर सिनेमा रिलीज होणार आहे. मानसिक आजाराशी झुंजत असलेला क्लारा घरात कैद असते. तर एक रेडिओ होस्टसोबत तिचं नातं बहरत जातं याची ही कहाणी आहे.

शेवटी K ड्रामा चाहत्यांसाठी 'माय कोरियन बॉयफ्रेंड' हा ब्राझिलियन रिएलिटी शो सध्या चर्चेत आहे. कोरियन ड्रामाचं फिक्शनल जग आणि इंटर कल्चरस नात्यावर शो आधारित आहे. पाच ब्राझिलियन महिला कोरियन पुरुषांसोबत लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये येतात आणि आपल्या नात्याची परीक्षा पाहण्यासाठी सियोलला जातात. हा शो १ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे.