पैसा वसूल मनोरंजन... ओटीटीवरील 'या' ६ धमाकेदार वेबसीरिज नक्की पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:43 IST2025-08-26T17:29:14+5:302025-08-26T17:43:18+5:30

या सीरिज पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही.

Ott Top 6 Web Series: सध्याच्या काळात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर सीरिजची काहीच कमी नाही, पण यामुळे काय पाहावे हा प्रश्न पडतो. जर तुम्हाला 'पैसे वसूल' अशा उत्तम सीरिज पाहायच्या असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास वेब सीरिजची यादी घेऊन आलो आहोत. या सीरिज पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही.

मनोज वाजपेयींच्या (Manoj Bajpayee) सर्वोत्कृष्ट सीरिज पैकी एक म्हणजे 'द फॅमिली मॅन' (The Family Man). ही सीरिज तुम्हाला हेरगिरीच्या दुनियेत घेऊन जाते. श्रीकांत तिवारी नावाच्या हेराची ही कथा आहे, जो एका बाजूला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतो.

या सीरिजची कथा इतकी रोमांचक आहे की तुम्ही ती एका दमात पूर्ण कराल. ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर लवकरच तिसरा सीझनही येतोय.

जयदीप अहलावतच्या 'पाताल लोक' (Paatal Lok) सीरिजची खूप चर्चा झाली. या सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झालेत. यामध्ये अभिनेत्याने हाथीराम चौधरी ही भूमिका साकारली आहे.

जयदीपच्या दमदार अभिनय आणि कथेमुळे ही सीरिज खूप लोकप्रिय झाली. अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या सर्वोत्कृष्ट सीरिजच्या यादीत 'पाताल लोक'चे नाव समाविष्ट आहे. ज्यांना सस्पेन्स आणि मिस्ट्री पहायचं आहे, त्यांच्यासाठी ही सीरिज एक उत्तम पर्याय आहे.

'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी' (Scam 1992: The Harshad Mehta Story) ही सीरिज शेअर बाजारातील सर्वात मोठ्या घोटाळ्यावर आधारित आहे. तुम्ही ती सोनी लिव्हवर पाहू शकता.

'कोटा फॅक्टरी' (Kota Factory) ही नेटफ्लिक्सवरील एक लोकप्रिय हिंदी वेब सीरिज आहे, जी कोटा शहरातील कोचिंग सेंटर आणि तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.

पंकज त्रिपाठी आणि अली फजल स्टारर 'मिर्झापूर' (Mirzapur) वेब सीरिजचा पहिला सीझन लॉकडाऊनमध्ये आला होता. या सीझनने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सीरिजचे तीन सीझन एकापाठोपाठ एक आले आहेत. ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

ही लोकप्रिय सीरिज आता चित्रपटाच्या रूपाने चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. येत्या २०२६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

तर शेवटची सीरिज आहे 'पंचायत' (Panchayat). ही भारतातील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. या सीरिजचे आतापर्यंत चार सीझन आले आहेत. ते तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

ही कथा फुलेरा गावाभोवती फिरते, जिथलं राजकारण आणि गावातल्या लोकांचे स्वभाव यामुळे या सीरिजची कथा आणखी फुलते.