PHOTOS : रिअल लाईफमध्ये फारच ग्लॅमरस आहे ‘मिर्झापूर’ची ‘गोलू गुप्ता’, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:16 PM2022-08-16T16:16:26+5:302022-08-16T16:25:56+5:30

Shweta Tripathi : होय, ‘मिर्झापूर’ सीरिजमधील ही गोलू खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. तिचे इन्स्टावरचे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

‘मसान’ या चित्रपटामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिला सगळे गोलू नावानं ओळखतात.

होय, ‘मिर्झापूर’ सीरिजमधील ही गोलू खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. तिचे इन्स्टावरचे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये श्वेता त्रिपाठी अतिशय सिंपल लुकमध्ये दिसली होती. पण रिअल लाईफमध्ये ती प्रचंड बोल्ड, ग्लॅमरस व बिनधास्त आहे.

‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमध्ये श्वेता त्रिपाठीची भूमिका छोटी होती. पण दुसऱ्या सीझनमध्ये गुड्डू भैय्यासोबत मिळून तिने मुन्ना व कालिन भैय्याला हादरवून सोडलं होतं.

श्वेता त्रिपाठ ही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर ती रोज ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

तिचे फोटो बघता, हीच ‘मिर्झापूर’ची गोलू आहे यावर क्षणभर विश्वास बसत नाही. सध्या श्वेता ‘मिर्झापूर 3’ची तयारी करतेय. लवकरच हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

कदाचित तुम्हाला माहित नसेल पण श्वेता ही दिल्लीचे माजी मुख्य सचिव पी. के. त्रिपाठी यांची मुलगी आहे. खरं तर तिला अभिनेत्री बनण्यात काहीही रस नव्हता. कारण तिला रंगमंच आवडायचा.

पण नशीबाने तिला बॉलिवूडमध्ये आणलं. तिला बॉलिवूड चित्रपटात संधी दिली. ‘मसान’नंतर श्वेता ‘हरामखोर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर केली होती.

श्वेता विवाहित आहे. चैतन्य शर्मासोबत 29 जून 2018 रोजी ती लग्नबेडीत अडकली. तिचा पती चैतन्य हा रॅपर आहे.

चैतन्य हा ‘स्लो चीता’ नावाने ओळखला जातो. श्वेतापेक्षा तो पाच वर्षांनी लहान आहे. मुंबईत अ‍ॅक्टिंग वर्ल्डमध्ये श्वेता व चैतन्य पहिल्यांदा भेटले आणि पुढे भेटींचा हा ‘सिलसिला’ सुरू राहिला. पुढे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग दोघांनी लग्न केलं.