ओटीटीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणार हे सिनेमे अन् वेबसीरिज, वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:40 IST2025-01-27T15:42:39+5:302025-01-27T16:40:31+5:30

ओटीटीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वेबसीरिज अन् सिनेमे येणार आहेत. वाचा संपूर्ण यादी

गेल्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झालेली 'पाताल लोक २' ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर ट्रेंडिंग आहे

या आठवड्यात २८ जानेवारीला ओटीटी हॉटस्टारवर 'द स्टोरीटेलर' ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. सत्यजीत रे यांच्या एका बंगाली लघुकथेवर हा सिनेमा आधारीत आहे

साउथमध्ये गाजलेला 'आयडेंटिटी' हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सिनेमा तृषा क्रिष्णन, टोविनो थॉमस यांची प्रमुख भूमिका आहे. ३१ जानेवारीला हा सिनेमा झी ५ वर रिलीज होतोय

'प्रतिपश्चंद्र' या मराठी कादंबरीवर आधारीत 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' ही वेबसीरिज आधारीत आहे. ही वेबसीरिज ३१ जानेवारीला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे

'युअर फ्रेंडली नेबरहूड स्पायडर मॅन' ही अॅनिमेटेड फिल्म रिलीज होणार आहे. २९ जानेवारीला ही सीरिज हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

२०२४ मध्ये गाजलेला 'पुष्पा २' सिनेमा अखेर ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. १००० कोटींची कमाई करणारा 'पुष्पा २' कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार हा सर्वांना प्रश्न पडला होता.

'पुष्पा २' सिनेमा ३० जानेवारी २०२५ ला नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे सर्वांना घरबसल्या 'पुष्पा २'चा आनंद घेता येईल