Virat Anushka Home : विराट अनुष्काच्या 'हॉलिडे होम'ला सुझैन खानचा मॅजिकल टच, पाहा Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 15:20 IST2022-11-25T14:50:24+5:302022-11-25T15:20:36+5:30
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्या फोटोंमधून हे नेहमीच दिसून येते. अलिबाग मध्येही त्यांचा एक आलिशान बंगला आहे. हा बंगला कोणत्याही स्वप्नातल्या बंगल्यापेक्षा कमी नाही. हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह! काय बंगला आहे.

कोहली आणि अनुष्काच्या या अलिबाग येथील घराचे हे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. एव्हास वेलनेस यांनी घराची रचना केली आहे. पूर्ण घर हे व्हाईट बेसवर बनले आहे.
घरातील डायनिंग एरिआ तर खुपच स्पेशियस आहे. ग्लास डोअर्स असलेला हा एरिआ असून यालाच लागून गार्डन एरिआ साठी एंट्री आहे.
आलिशान लिव्हिंग रुम आहे. व्हाईट आणि ग्रीन थिम वर घराचे स्ट्रक्चर दिसून येते. हवेशीर पण तितकेच प्रायव्हेट असे हे घर वाटते.
एकंदर घराची रचना हवेशीर, आकर्षक आणि खूपच खास आहे. चाहते तर या घराच्या प्रेमातच पडले आहेत. तर संपूर्ण घराचे डिझाईन हे सुझैन खान ने केले आहे. सुझैन खान हृतिक रोशनची पहिली पत्नी आहे.
सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इथला पूल एरिआ. गार्डन मध्येच लाकडी डेकवर स्विमिंग पूल आहे.
हे घर एखादे स्वप्नवत घर असल्यासारखेच वाटेल असे आहे. जवळच अलिबाग चा समुद्रकिनारा असणार आहे. हॉलिडे साठी विराट अनुष्काचे हे आवडते ठिकाण असणार हे नक्की. (सर्व फोटो सौजन्य - archdigestindia instagram)