'जवान' फेम अभिनेता विराज घेलानी अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:37 IST2024-12-13T15:27:28+5:302024-12-13T15:37:40+5:30
एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत असताना एका सेलिब्रिटीच्या लग्नातले फोटो समोर आले आहेत.

दिवाळीनंतर सर्वत्रच लग्नसराई सुरु होते. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच लग्नबंधनात अडकत आहेत.
कन्टेंट क्रिएटर, स्टँडअप कॉमेडियन आणि आता अभिनेता अशी ओळख मिळवलेला विराज घेलानी यानं लग्न केलं आहे.
विराज घेलानीनं त्याची गर्लफ्रेंड पलक खिमावत हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
लग्नासाठी दोघांनीही स्पेशल लूक केलेला होता. पलक लाल रंगाच्या साडीत सुंदर दिसतेय. तर विराज हा ब्लॅक सूटमध्ये अगदी हॅण्डसम दिसतोय.
विराजने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहलं, "Happily married and still debating over A.C temperature settings for life!".
शेअर केलेल्या फोटोमध्ये लग्नानंतर दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
विराज आणि पलक खिमावत यांच्यावर चाहत्यांनी आणि सेलिब्रेटी मित्रमैत्रीणींनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
विराजने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, "पलकशी त्याची भेट एका गरबा कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर त्याने पलकला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि तिला दरवर्षी गरब्यातच भेटत असे".विराज आणि पलकने काही वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. काही दिवसांपुर्वीच त्यांचा साखरपूडा झाला.
विराज घेलानीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आपल्या कामाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.
विराजने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातही काम केले आहे. विराजचा मोठा चाहतावर्ग आहे.