असलम खान यांच्याप्रमाणेच या कलाकाराने देखील रामायणात साकारल्या आहेत अनेक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:00 IST2020-04-25T06:00:00+5:302020-04-25T06:00:01+5:30

लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या मालिकेत विजय कविश यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. त्यांना वाल्मिकी यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले होते.

विजय या मालिकेत वाल्मिकीसोबतच शिव आणि रावण यांच्या सासऱ्याच्या भूमिकेत दिसले होते.

विजय यांनी एका मालिकेत अनेक भूमिका साकारल्या असल्या तरी त्यांच्या गेटअप आणि मेकअपमुळे ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली नाही.

रामायण या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

विजय यांचे जुने आता आताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

















