माझी तुझी रेशीमगाठ: हळदी समारंभासाठी नेहाचा स्पेशल लूक; भावी जोडीदाराला पाहून यश झाला क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:50 IST2022-06-09T13:46:28+5:302022-06-09T13:50:27+5:30

Mazi tuzi reshimgath:पुन्हा नव्याने संसार करायला निघालेली नेहा यशसोबत लग्न होणार असल्यामुळे प्रचंड खूश आहे. म्हणूनच, तिने हळदीसाठी खास लूक केला आहे.

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) या मालिकेत सध्या यश आणि नेहा यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.

नुकताच या दोघांचा मेहंदी सोहळा संपन्न झाला असून दोघांच्याही घरी हळदीच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

अगदी खऱ्या खुऱ्या आयुष्यात ज्याप्रमाणे लग्नसोहळा रंगतो अगदी तसाच सोहळा करण्याचा प्रयत्न या मालिकेत होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

यश-नेहाची हळद असल्यामुळे घरातील प्रत्येक पै-पाहुण्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करुन ड्रेसकोडची थीम फॉलो केली आहे.

हळदी समारंभासाठी नेहा, यश आणि परी यांनी छान गेटअप केला असून नेहाचा लूक सध्या चर्चेत येत आहे.

पुन्हा नव्याने संसार करायला निघालेली नेहा यशसोबत लग्न होणार असल्यामुळे प्रचंड खूश आहे. म्हणूनच, तिने हळदीसाठी खास लूक केला आहे.

सध्या सोशल मीडियावर नेहाचे हळदी समारंभातील काही फोटो व्हायरल होत आहेत. यात तिने पिवळ्या रंगाची छानशी साडी नेसली आहे.

नेहाच्या या फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे.