विनोदवीर Sunil Grover ची पत्नी आहे लाइमलाइटपासून दूर; सौंदर्याच्या बाबतीत आहे अभिनेत्रींच्या तोडीस तोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:36 IST2022-02-03T14:29:01+5:302022-02-03T14:36:32+5:30
Sunil grover: इतर सेलिब्रिटींच्या पत्नीप्रमाणे आरतीला पार्टी, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं फारसं आवडत नसल्याचं सांगण्यात येतं.

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रिय झालेला विनोदवीर म्हणजे सुनील ग्रोव्हर. या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
गुत्थी, डॉक्टर मशहूर गुलाटी, रिंकू देवी अशा कितीतरी भूमिका साकारुन त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
छोटा पडदा गाजवणाऱ्या सुनीलने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनेता सलमान खानसोबत तो 'भारत' चित्रपटातही झळकला आहे.
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सुनीलची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. त्यामुळे त्याच्याविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.
सुनीलचं लग्न झालं असून त्याला एक मुलगादेखील आहे. परंतु, सुनील फार क्वचित वेळा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.
सुनीलच्या पत्नीचं नाव आरती असून मुलाचं नाव मोहन आहे.
सोशल मीडियावर फारशी अॅक्टीव्ह नसलेली आरती एक इंटेरिअर डिझायनर आहे.
इतर सेलिब्रिटींच्या पत्नीप्रमाणे आरतीला पार्टी, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं फारसं आवडत नसल्याचं सांगण्यात येतं.
सुनील ग्रोवरने त्याच्या करिअरची सुरुवात RJ म्हणून केली होती. हंसी के फुंवारे ही सीरिज त्याने चालवली होती.
१९९५ मध्ये त्याने दुरदर्शनवरील फुल टेंशन या कॉमेडी शोमधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. १९९८ मध्ये प्यार तो होना ही था या चित्रपटातून त्याने बॉलिवूड पदार्पण केलं होतं.