जम्मू-काश्मीरमध्ये मराठी अभिनेत्रीचं बॉलिवूड स्टाइल फोटोशूट, लाल रंगाच्या साडीत दाखवल्या कातिल अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:05 IST2025-04-28T11:02:29+5:302025-04-28T11:05:48+5:30
टीव्ही अभिनेत्रीने तिचे जम्मू-काश्मीरमधील फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर अनेकांनी त्यांच्या काश्मीरच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
टीव्ही अभिनेत्रीने तिचे जम्मू-काश्मीरमधील फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत.
'मुरांबा' फेम अभिनेत्री निशाणी बोरुलेने लाल रंगाच्या साडीत जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये बॉलिवूड स्टाइल हॉट फोटोशूट केलं आहे.
"दिल से पूछो, इश्क़ का मौसम कभी ठंडा नहीं होता", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
या फोटोंमध्ये काश्मीरच्या सौंदर्यासोबतच निणाशीचं सौंदर्यही उठून दिसत आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
निशाणीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, 'मुरांबा'मध्ये निशाणीने रेवा ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला पसंती मिळाली होती.