'मला तेव्हा खूप राग आला, मी स्वत:ला शांत केलं, पण...'; बदलापूरमधील रेप सीनवर हुमा कुरैशीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 01:31 PM2023-01-01T13:31:56+5:302023-01-01T14:30:00+5:30

‘बदलापूर’ चित्रपटात हुमा कुरैशीनेने साकारलेली भूमिका आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते.

अभिनेत्री हुमा कुरैशीने (Huma Qureshi)अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बदलापूर’ चित्रपटात हुमाने साकारलेली भूमिका आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते.

बदलापूर चित्रपटात हुमासोबत अभिनेता वरुण धवण आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आले. चित्रपटात हुमाने सेक्स वर्करची भूमिका बजावली होती. आता अभिनेत्रीने चित्रपटात बलात्काराचा सीन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

हुमा कुरैशीने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. हुमा कुरैशी म्हणाली की, बदलापूर चित्रापटात मी सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. आपण अगदी सहजपणे एखाद्या महिलेला जज करतो. पण सेक्स वर्करचं काम करणारी देखील एक महिला आहे. त्या भूमिकेत मला काही गोष्टी प्रचंड आवडल्या, पण रेप सीन शूट करताना मला वाईट वाटत होतं, असं हुमा कुरैशीने सांगितले.

हुमा कुरैशी पुढे म्हणाली की, श्रीराम राघवन आणि वरुण धवन यांच्यासोबत मला सुरक्षित वाटत होतं. मला आठवत आहे, मी माझ्या खोलीत परतत होती. मी पूर्ण दिवस कपडे घालून असायची. पण ते सर्वकाही बनावट होतं. घरी गेल्यानंतर मला प्रचंड राग यायचा. माझा थरकाप उडाला होता. तुम्ही यासर्व गोष्टींची कल्पना दुसऱ्या व्यक्तींसोबत करू शकत नाही. तेव्हा मला प्रचंड राग आला होता, पण मी स्वतःला शांत केलं, असं हुमा कुरैशी म्हणाली.

विशेष म्हणजे हुमा कुरेशी शेवट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तिनं राजकुमार राव आणि सिकंदर खेरसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटातील हुमा कुरेशीचा अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती.

दरम्यान, 'डबल एक्सएल' या चित्रपटात हुमासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील दिसली. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी जगातील महिलांसोबत बॉडी शेमिंगबद्दल बोलताना दिसली. पाहिलं तर बॉडी शेमिंग ही अशी समस्या आहे, ज्याचा त्रास प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी सहन करावा लागतो. जास्त बारीकपणामुळे असो किंवा लठ्ठपणामुळे, याचा त्रास सहन प्रत्येकाला सहन करावा लागतो.