पैठणी आणि साऊथ स्वॅग! बहिणीच्या लग्नात 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचीच हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:26 IST2024-05-03T17:22:21+5:302024-05-03T17:26:37+5:30
बहिणीच्या लग्नात मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक थाट, पाहा फोटो

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने माया हे पात्र साकारलं होतं.
या मालिकेने रुचिराला लोकप्रियता मिळवून दिली. रुचिराचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतंच रुचिराने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.
रुचिराच्या बहिणीचं लग्न नुकतंच पार पडलं. बहिणीच्या लग्नात करवली बनवलेल्या रुचिराचा हटके अंदाज पाहायला मिळाला.
रुचिराने पांढऱ्या रंगाची पैठणी नेसून साऊथ इंडियन लूक केला होता. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
पैठणी नेसून तिने पारंपरिक ज्वेलरी घातल्याचं दिसत आहे. "मराठमोळी पैठणी आणि साऊथ स्वॅग" असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.
रुचिराने फोटोसाठी गॉगल लावून हटके पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
सध्या रुचिरा स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत काम करत आहे. तिने 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभाग घेतला होता.