Akshaya Hardeek Wedding : लग्न हार्दिक-अक्षयाचं अन् भाव खाऊन गेली वीणा जगताप, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:00 PM2022-12-04T17:00:09+5:302022-12-04T17:12:40+5:30

Akshaya Hardeek Wedding, Veena Jagtap : हार्दिक व अक्षयाच्या लग्नाच्या फोटो व व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोतील एका चेहऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. होय, हा चेहरा कुणाचा तर अभिनेत्री वीणा जगताप हिचा...

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई अर्थात हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली.

पुण्यात हार्दिक व अक्षयाचा शाही विवाह सोहळा पार पडला. तूर्तास या लग्नाच्या फोटो व व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोतील एका चेहऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

होय, हा चेहरा कुणाचा तर अभिनेत्री वीणा जगताप हिचा. वीणाने राणादा व पाठकबाईच्या लग्नात चांगलीच हवा केली.

अगदी मेहंदी, संगीत, हळद, लग्न, रिसेप्शन सगळ्या प्रसंगी वीणा हजर होती. या लग्नात तिने धम्माल मस्ती केली.

अक्षया व हार्दिकच्या लग्नात वीणा चांगलीच भाव खाऊन गेली. या लग्नसोहळ्यातील फोटो तिने शेअर केले आहेत.

वीणा ही अक्षया व हार्दिकची जवळची मैत्रिण आहे. अक्षयाच्या लग्नसोहळ्यात वीणा करवली म्हणून मिरवताना दिसली.

वीणा जगताप बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली होती. यावेळी सहस्पर्धक शिव ठाकरेसोबत तिचं सूत जुळलं होतं.

शिव आणि वीणा लग्नबंधनात अडकतील, अशा चर्चा होत्या मात्र काही काळापूर्वी दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त आलं.

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून वीणा जगतापने अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. त्यानंतर आई माझी काळूबाई, ठिपक्यांची रांगोळी या मालिकांतही ती झळकली.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ या मालिकेत ती हार्दिकसोबत दिसली होती.