मराठी मुलगी ते इंटरनॅशनल मॉडेल! 'बिग बॉस मराठी'तील या सदस्याची बहीण; कोण आहे ही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:41 IST2026-02-02T14:34:08+5:302026-02-02T14:41:48+5:30
साध्या मराठीत कुटुंबात जन्म, वडील मुंबईचे डेप्युटी पोलिस कमिशनर होते, आज मॉडेलिंग विश्वात तिचं मोठं नाव आहे.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये काल दुसरं एलिमिनेशन पार पडलं. अभिनेत्री सोनाली राऊत घराबाहेर गेली.

सोनाली राऊतचे वडील हे मुंबईचे डेप्युटी पोलिस कमिशनर होते. त्यांना ५ मुली आहेत. त्यातील एक सोनाली तर तिची मोठी बहीण कोण माहितीये का?

उज्वला राऊत ही सोनालीची मोठी बहीण आणि इंटरनॅशनल सुपरमॉडेल आहे. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली सोनाली इंटरनॅशनल मॉडेल कशी बनली?

उज्वला एका मुलाखतीत म्हणालेली की, "आमच्या घरी खूप शिस्तीचं वातावरण होतं. मला ४ बहिणी आहेत. आम्हाला जे हवंय त्यासाठी कायम लढावं लागलं. काहीही हवं असेल तर त्याचं उत्तर नाही असंच असायचं."

उज्वलाला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. १९९६ साली उज्वलाने फेमिना मिस इंडियामध्ये फेमिना लूक ऑफ द इयर किताब जिंकला. तेव्हा ती फक्त १७ वर्षांची होती. फ्रान्समधील एलाईट मॉडेल लूक कॉन्टेस्टमध्येती टॉप १५ पर्यंत पोहोचली होती.

यानंतर उज्वलाचं मॉडेलिंग क्षेत्रात मोठं नाव झालं. न्यूयॉर्क आणि पॅरिस फॅशन सर्कल्समध्ये सहभागी होणारी ती मोजक्या एशियन मॉडेलपैकी एक होती.

तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मासिकांसाठी मॉडेलिंग केलं आहे. ज्या मासिकांचं नावही माहित नव्हतं त्यात ती झळकली. यासाठी तिला तिच्या बहिणीनेच प्रोत्साहन दिलं. वयाच्या २३ व्या वर्षी ती टॉम फोर्डच्या रॅम्पवरही उतरली.

उज्वलाने २००४ साली २६ व्या वर्षी ब्रिटीश मॉडेल आणि बिझनेसमन क्रेग मॅक्सवेल स्टेरीसोबत लग्न केलं. दोघं फ्रान्समध्ये एका ब्लाइंड डेटवेळी भेटले होते. पुढच्याच वर्षी तिने मुलीला जन्म दिला. दोघंही गोव्यात राहत होते.

मात्र अचानक उज्वलाच्या वैवाहित आयुष्यात वादळ आलं. मॉडेलिंग सुरु असताना उज्वला सहकाऱ्यांनी दिलेले महागडे गिफ्ट्स घरी आणायची. त्यावरुन स्टेरीने तिच्यावर संशय घेतला आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. २००९ साली त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

घटस्फोटावेळी उज्वलाने लेकीला आणि तिला स्टेरीपासून धोका आहे असं सांगितलं. नंतर तिने स्टेरीला लेकीला भेटूही दिलं नाही. तर दुसरीकडे स्टेरीनेही काही उज्वलावर काही आरोप लावले.

उज्वला आजही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रसिद्ध मॉडेल आहे. तरुणाईला ती या क्षेत्रात येण्यासाठी तयार करत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर काम करण्यासाठी ती तत्पर असते.

















