हिचे सौंदर्य करेल घायाळ...! ओळखा कुठल्या मालिकेत पाहिले हिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:48 IST2020-04-14T15:36:41+5:302020-04-14T15:48:02+5:30

उर्फीच्या ‘कातिल अदा’

छोट्या पडद्यावरची क्यूट अ‍ॅक्ट्रेस उर्फी जावेद हिच्या हॉट फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

उर्फी छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा आहे.

बडे भइया की दुल्हनिया, मेरी दुर्गा आणि बेपनाह यासारख्या मालिकेत तिने काम केले आहे.

छोट्या पडद्यासोबतच सोशल मीडियावरही ती तितकीच लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर करण्यात ती जराही मागे नाही.

याचमुळे सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

उर्फी मुळची लखनौची. दिल्लीत तिने फॅशन डिझाईनरचे काम केले आणि नंतर मुंबईत आली.

मुंबईत तिला मॉडेलिंगची संधी मिळाली आणि पुढे अभिनयाचीही.

बडे भइया की दुल्हनियां या मालिकेत तिने अवनी पंतची भूमिका साकारली होती.

यानंतर चंद्र नंदिनीमध्ये छायाची भूमिका साकारली.

उर्फीने को-स्टार पारस कलनावतला डेट केले. पण हे नाते फार काळ टिकले नाही.

उर्फी फिटनेसबद्दल अतिशय सजग आहे.

सोशल मीडियावर अनेक फिटनेस व्हिडीओ ती शेअर करते.