SEE PICS : युजर म्हणाला, दीदी पँट लूज है! सोनारिकाने दिले भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 18:00 IST2020-09-16T17:49:48+5:302020-09-16T18:00:46+5:30
देवों का देव महादेव या मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनारिका भदोरियाने ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत खरमरीत उत्तर दिले.

सोनारिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा टॉप आणि थोडी लूज जिन्स परिधान केली आहे. तिने हे फोटो शेअर केले आणि लगेच लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
तुम सूखकर मर जाओ, दीदी पँट लूज है, अशा काय काय कमेंट करत लोकांनी सोनारिकाला ट्रोल केले.
आधी तर सोनारिकाने या कमेंटकडे दुर्लक्ष केले. मग मात्र तिने या ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत सुनावले. तुम सुखकर मर जाओ, ही कमेंट पाहून सोनारिका चांगलीच भडकली. ही कमेंट करणाºया युजरला तिने जाम फैलावर घेतले. ‘तुम तो इतने फूले हुए हो फट कर नहीं मरे अभी तक,’ असे तिने या युजरला सुनावले.
28ची कंबर असताना तू 34 साईजची जीन्स का घेतली ? असा सवाल एका युजरने तिला केला. यावर ‘जीन्सचे पैसे तुझ्या बापाने दिलेत का? नाही ना, मग गप्प बस,’ असे उत्तर सोनारिकाने दिले.
दीदी पँट लूज है, असे लिहिणाºया युजरलाही तिने फटकारले. हां, बिलकुल आपके दिमाग की तरह, असे म्हणत तिने या युजरची बोलती बंद केली.
देवो के देव महादेव या हिंदी मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे.
पृथ्वी वल्लभ, दास्तान-ए-मोहब्बत या मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे.
सोनारिकाने तुम देना साथ मेरा या मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
सोनारिकाने 2015 मध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांमध्य पदार्पण केले.सोनालिकाने तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.