एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:48 IST2025-06-05T13:26:32+5:302025-06-05T13:48:10+5:30

हिना खानच्या हातावर सजली रॉकीच्या नावाची मेहेंदी, अभिनेत्रीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर

टीव्ही अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हिनाने बुधवारी(४ जून) रॉकीसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केलं.

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. तिच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

लग्नासाठी हिनाने डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. आता तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

हिनाने हातावर रॉकीच्या नावाची मेहेंदी काढली. अगदी सिंपल पण सुंदर मेहेंदी हिनाच्या हातावर रंगली.

हिना सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. गेल्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं.

हिनाच्या या कठीण काळात रॉकी तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. त्याने तिची साथ सोडली नाही.

आता लग्न करत दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.