"सिरीयलमध्ये संस्कारी आणि...", मराठमोळ्या अभिनेत्रीचे बिकिनीतील फोटो पाहून चाहते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:53 IST2025-03-12T15:47:38+5:302025-03-12T15:53:57+5:30
अभिनेत्रीचे हा हॉट लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. काही चाहत्यांनी मात्र या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे.

'जीव माझा गुंतला' मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात पोहोचली. त्यानंतर योगिता बिग बॉस मराठीमध्ये दिसली होती.
योगिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सध्या ती बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
योगिताने बीचवरील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बिकिनी लूक पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीचे हा हॉट लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. योगिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पण, काही चाहत्यांनी मात्र योगिताच्या या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे. योगिताचे हे बिकिनीतील फोटो चाहत्यांना रुचलेले नाहीत.
"टीव्ही सिरीयलमध्ये किती संस्कारी आहेत", असं एकाने म्हटलं आहे.
"असे फोटो टाकून इमेज कशाला खराब करतेस", "मालिकेत दाखवायचं एक आणि वागायचं वेगळं", अशा कमेंट्सही केल्या आहेत.
"मराठी संस्कृती आहे त्याचं भान ठेवा", असंही म्हटलं आहे.
"अशा फोटोंमुळे इमेज खराब होते", "असे फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा उद्देश काय? प्रसिद्धी आणि पैशासाठी काहीही", अशा कमेंटही केल्या आहेत.