टीव्ही अभिनेत्रीचं फोटोशूट व्हायरल, वयाच्या ४२ व्या वर्षी कमबॅक करणार; ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 15:23 IST2025-05-04T15:19:33+5:302025-05-04T15:23:56+5:30

एकेकाळी अभिनेत्रीच्या मालिका खूप गाजल्या, आजही तिचं सौंदर्य कायम आहे.

टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकार आज स्क्रीनवरुन गायब झाले आहेत. काहींनी अनेक वर्षांनी कमबॅकही केलं आहे.

ही अभिनेत्री आहे आमना शरीफ (Aamna Sharif). सुंदर चेहरा, गोड स्माईल यामुळे आमनाच्या सौंदर्यावर चाहते फिदा असायचे. बऱ्याच वर्षांनी ती पुन्हा स्क्रीनवर दिसणार असल्याची चर्चा आहे.

अशीच एक अभिनेत्री जी एकेकाळी मालिकांमध्ये रोमँटिक भूमिकांमध्ये दिसायची. तिच्या आता कमबॅकच्या चर्चा आहेत. तसंच या चर्चांमध्ये तिचं फोटोशूटही व्हायरल होत आहे.

आमना 'कही तो होगा' या मालिकेमुळे लोकप्रिय झाली होती. यामध्ये तिची जोडी राजीव खंडेलवालसोबत होती. त्यांची जोडी सुपरहिट झाली होती.

आता हीच जोडी पु्न्हा एकत्र येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहतेही भलतेच खुश झालेत आणि त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

यादरम्यान आमनाचं फोटोशूटही व्हायरल होत आहे. व्हाईट ब्लाऊज आणि निळ्या साडीत ती जणू अप्सराच दिसत आहे. आजही वयाच्या ४२ व्या वर्षी तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे.

तिचा हा बॅकलूक तर घायाळ करणारा आहे. यात ती तिचा कमरपट्टा फ्लॉन्ट करत आहे. 'तुझ्यासारखी अजून कोणीच नाही','लवकर कमबॅक कर आमना' अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत.