Tunisha Sharma: तुनिशा शर्मा प्रकरणी मोठी माहिती आली समोर, अभिनेत्रीच्या सुसाइडनंतर शिजाननं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 15:15 IST2023-01-07T15:09:02+5:302023-01-07T15:15:53+5:30
Tunisha Sharma Case: तुनिशा शर्मा प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान आता नवीन माहिती समोर आली आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिशा शर्माने २४ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. तुनिशाने तिची मालिका 'अली बाबा दास्तान ए काबुल'च्या सेटवर हे पाऊल उचलले होते.
अभिनेत्रीच्या आईने माजी प्रियकर शिजान खानवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व प्रकारे तपास करत आहेत.
दरम्यान, आता मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनेच्या दिवशी शीजानने सीक्रेट गर्लफ्रेंडशी केलेल्या चॅटिंगचा शोध घेतला आहे.
तुनिशाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस बारकाईने तपास करत आहेत आणि याच दरम्यान शिजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडशी झालेले चॅटिंगही पोलिसांच्या हाती लागलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार शिजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचा फोन महाराष्ट्रातील वालीव पोलिसांनी जप्त केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सीक्रेट गर्लफ्रेंडने दोघांचे चॅट डिलीट केले होते, ज्या परत मिळवले गेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवला आहे.
अधिकारी असा दावा करत आहेत की शिजनने दोघांच्या चॅट देखील डिलीट केले होते, ज्याचा काही भाग पुनर्प्राप्त करण्यात आला आहे.
वालीव पोलिसांचे म्हणणे आहे की, तुनिशाच्या मृत्यूनंतर शिजनने सीक्रेट गर्लफ्रेंडसोबत तासभर चॅट केले होते. नंतर ते डिलिट केले. पोलिसांचे असेही म्हणणे आहे की, सीक्रेट गर्लफ्रेंडशिवाय शिजान अनेक मुलींशी बोलत होता.
तुनिशा शर्माने शिजान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला होता. शिजानने अभिनेत्रीला रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तुनिशाच्या आईने शीजानवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला.
पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी शिजान खानला ताब्यात घेतले. त्याचवेळी, आता रिमांड संपल्यानंतर शिजानची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.