'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील चंदा आठवते? खऱ्या आयुष्यात दिसते फारच सुंदर, 'या' मालिकेत करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:23 IST2026-02-12T17:07:39+5:302026-02-12T17:23:43+5:30
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील चंदा आठवतेय? आता दिसते फारच वेगळी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम

'झी मराठी' वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका चांगलीच गाजली होती. कोल्हापूरच्या अस्सल मातीतली,राणा आणि अंजलीची प्रेमकथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.

अभिनेता हार्दिक जोशी,अक्षया देवधर, धनश्री काडगावर तसेच अमोल नाईक, दिप्ती सोनावणे या कलाकारांच्या मुख्य भूमिका होता. या कलाकरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

या मालिकेतील राणादा, पाठकबाई, वहिनीसाहेब आणि चंदा ही पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटायची.

'तुझ्यात जीव रंगला'मध्ये चंदाच्या भूमिकेत अभिनेत्री दीप्ती सोनावणे झळकली होती. मालिकेत वहिनीसाहेब म्हणजेच नंदिताची पाठराखीण म्हणून ती पाहायला मिळाली. आपल्या छोट्याश्या भूमिकेतून तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

दरम्यान, मालिकेत साडी आणि एक वेणीमध्ये दिसणारी गावाकडची चंदा खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते.

दीप्ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.


















