मधुराणीला मागे टाकत 'ही' अभिनेत्री घेते छोट्या पडद्यावर सर्वाधिक मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 14:44 IST2023-05-22T14:39:16+5:302023-05-22T14:44:11+5:30
Tv actress: जाणून घ्या, छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींविषयी

ज्ञानदा रामतीर्थकर - ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर.
अप्पूची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री एका भागासाठी ३८ हजार रुपये फी घेते.
समृद्धी केळकर - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर. आजवर समृद्धीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत झळकत असलेली समृद्धी एका भागासाठी ३१ हजार रुपये घेते.
मधुराणी गोखले - आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले.
मधुराणी या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारत असून एका भागासाठी ती ४० हजार रुपये मानधन घेते.
गिरीजा प्रभू- गिरीजा सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करत आहे.
या मालिकेच्या एका भागासाठी ती ३५ हजार रुपये घेते.
प्रार्थना बेहरे - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. मालिकांसह सिनेमात झळकलेल्या प्रार्थनाने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
प्रार्थना एका भागासाठी ४२ हजार रुपये घेते. अलिकडेच ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकली होती.