जांभळ्या जरतारी साडीत जुईचं फोटोशूट, सासूबाई कमेंट करत म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 13:25 IST2024-07-13T13:17:05+5:302024-07-13T13:25:56+5:30
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

मराठी मालिका विश्वातील आघाडीच्या नायिकांच्या यादीत जुई गडकरी हे नाव अग्रस्थानी येतं.
स्टार प्रवाहवरील 'पुढलं पाऊल' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने नावारुपाला आली.
सध्या 'ठरलं तर मग' मालिकेमुळे अभिनेत्री चर्चेत आहे. त्यात तिने साकारलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांना भावल्याचं दिसतंय.
जुई अनेकदा तिचे फोटो इंटरनेटवर शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते.
सोशल मीडियावर अभिनेत्री सातत्याने चर्चेत येत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
अलिकडेच तिने जांभळ्या रंगाची साडी नेसून नवं फोटोशूट केलं आहे. तिचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
फोटोंमध्ये जुईने जांभळ्या रंगाची हॅंडलूम प्रिंटेड साडी नेसली आहे. तसेच पदरावर प्रिंट केलेले राधा-कृष्ण प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहेत.
त्याचबरोबर हातात वीणा घेत तसेच झोपाळ्यावर बसून वेगवेगळ्या पोज देत तिने फोटो क्लिक केलेत.