ख्रिसमस सेलिब्रेशन अन् मनसोक्त भटकंती; तेजस्विनी लोणारीचं लंडनमध्ये रोमँटिक हनिमून, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:54 IST2025-12-10T13:37:39+5:302025-12-10T13:54:33+5:30

मिस्टर अँड मिसेस सरवणकर यांची लग्नानंतर लंडनमध्ये भटकंती

मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. लग्नानंतर आता दोघं हनिमूनसाठी लंडनला गेले आहेत.

तेजस्विनीने आता लंडनमधील काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. समाधान यांच्यासोबत ती रोमँटिक पोज देत आहे. नवऱ्यासोबत ती मनसोक्त लंडन फिरत आहे.

तसंच आता सगळीकडेच ख्रिसमसचा उत्साह आहे. लंडनही ख्रिसमसच्या सजावटीत सजलं आहे. याची झलक तिने फोटोंमधून दाखवली आहे.

तेजस्विनीच्या या फोटो अल्बममधून लंडनमधल्या सुंदर प्रेक्षणीय स्थळांची झलक दिसत आहे. तसंच तेजस्विनी आणि समाधान एकमेकांचा हातात हात पकडून चालत आहेत.

लंडनच्या प्रसिद्ध वॉच टॉवरसमोरुनही तिने फोटो शेअर केला आहे. समाधान यांचा हात धरुन ती प्रेमाने त्यांच्याकडे पाहत आहे. पिंक जॅकेटमध्ये ती क्युट दिसत आहे.

प्रसिद्ध लंडन ब्रिजवरूनही दोघांनी फोटोशूट केलं आहे. कधी सिंगल तर कधी एकमेकांसोबत त्यांनी पोज दिली आहे.

तेजस्विनी नवऱ्यासोबत एकदम खूश दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचा ग्लोही स्पष्ट दिसत आहे. घाऱ्या डोळ्यांमुळे तिने आधीच अनेकांना घायाळ केलंच आहे.