'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम मुनमुन दत्ताला आहे गाण्याची आवड, बालपणीची फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 18:51 IST2020-07-07T18:51:33+5:302020-07-07T18:51:33+5:30

टीव्ही सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (PHOTO INSTAGRAM)

मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचे दोन फोटो शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)

या फोटोंमध्ये टीव्ही अभिनेत्री गाणं गाताना दिसली. (PHOTO INSTAGRAM)

मुनमुनने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला गाणं गाताना ऐका. मला बालपणीचे ही दोन फोटो सापडले. पहिला फोटो माझ्या वाढदिवसाचा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मी सरस्वती पूजेमध्ये गाणं गाताना. (PHOTO INSTAGRAM

मुनमुन दत्ता 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (PHOTO INSTAGRAM)

मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते (PHOTO INSTAGRAM)