'तारक मेहता...' फेम सोनू भिडे आता दिसते खूपच ग्लॅमरस, अभिनय सोडून रमली वेगळ्याच विश्वात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 12:11 PM2023-05-29T12:11:05+5:302023-05-29T12:28:20+5:30

भिडे मास्तरांची एकुलती एक लेक 'सोनू' म्हणजेच झील मेहता सध्या काय करते?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता मालिकेतील अनेक कलाकार बदलले आहेत त्यामुळे जुन्या कलाकारांची चाहत्यांना आठवण येत असते. जुन्या कलाकारांपैकीच एक म्हणजे मालिकेतील सर्वात पहिली सोनू.

भिडे मास्तरांच्या लाडकी लेक सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता (Jheel Mehta) सध्या काय करते असा प्रश्न सर्वांना पडला असेल. झीलने २००८ ते २०१२ असं ४ वर्ष काम केलं आणि नंतर अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी मालिका सोडली. यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. सोनू म्हणून प्रेक्षकांना आजही झीलचीच आठवण येते.

आता इतक्या वर्षांनी सोनू म्हणजेच झीलचे लेटेस्ट फोटो व्हायरल झालेत. तिचा लुक पूर्णपणे बदलला आहे. झील खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरल दिसत आहे.

विशेष म्हणजे तिच्या आयुष्यात स्पेशल व्यक्तीचीही एंट्री झाली आहे. एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत तिने याची झलक दाखवली होती. तिने त्या स्पेशल व्यक्तीसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. मात्र याबद्दल तिने काहीच अधिक माहिती दिलेली नाही.

झीलने आता अभिनय क्षेत्र सोडलं असून तिने वेगळं करिअर निवडलं आहे. ग्लॅमरच्या दुनियेपासून ती दूर गेली आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन लक्षात येतं की झील आता मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे.

झीलने तिच्या आईसोबत हेअर अँड मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. याशिवाय ती एका ईकॉमर्स कंपनीत सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह पदावर काम करत आहे.

झीलला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या भटकंतीचे काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर तिला १ लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. चाहतेही तिचा बदलेला लुक पाहून खूश झालेत.

झीलने इन्स्टाग्रामवर तारक मेहता मालिकेतला एक जुना फोटोही पोस्ट केलाय. टप्पू सेना बीचवर पोज देतानाचा हा फोटो आहे. हा फोटो पोस्ट करत तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षांव केलाय.