'पाठक बाईं'सोबत ब्रेकअप, मग सुयशच्या आयुष्यात आयुषीची एंट्री, भन्नाट आहे दोघांची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 10:30 AM2023-04-15T10:30:49+5:302023-04-15T12:29:11+5:30

सुयश टिळकने पहिल्यांदाच त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याच कारण म्हणजे त्याने दिलेली एका मुलाखत ठरलीय. (फोटो इन्स्टाग्राम)

या मुलाखतीत सुयशने त्याच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. यादरम्यान विचारलेल्या रिलेशनशीप ते ब्रेकअप यासगळ्या प्रश्नांची त्याने मोकळेपणे उत्तर दिलीत. (फोटो इन्स्टाग्राम)

का रे दुरावा या मालिकेमुळे सुयश टिळक हे नाव घराघरात पोहोचले. याचदरम्यान तो आणि अक्षय देवधरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगू लागली. (फोटो गुगल)

दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल कधीही काही लपवलं नव्हतं. चाहत्यांना ही दोघांची जोडी आवडत होती. (फोटो गुगल)

मात्र अचानक एकदिवस दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आणि त्यांच्या ब्रेकअप झाल्याची बातमी आली. त्यानंतर दोघेही आपआपल्या आयुष्यात पुढे निघून गेले.

अक्षयाने हार्दिक जोशीसोबत लग्नगाठ बांधली तर सुयशनं आयुषी भावेसोबत लग्न केलं. (फोटो इन्स्टाग्राम)

प्लॅनेटला दिलेल्या मुलाखतीत सुयशने अक्षयासोबत ब्रेक झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात आयुषीची एंट्री कशी झाली याचा किस्साही सांगितला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेत आयुषी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि सुयश या कार्यक्रमात त्याच्या एका मालिकेचं प्रमोशन करायला गेला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

या कार्यक्रमात सुयशने आयुषीला पहिल्यांदा पाहिलं. अर्थात स्पर्धेच्या निमित्ताने भेट झाली असली तरी प्रेम काही लगेच बहरलं नाही. सुयशला आयुषी पहिल्याच नजरेत आवडली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

या कार्यक्रमात सुयशने आयुषीला पहिल्यांदा पाहिलं. अर्थात स्पर्धेच्या निमित्ताने भेट झाली असली तरी प्रेम काही लगेच बहरलं नाही. सुयशला आयुषी पहिल्याच नजरेत आवडली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

वर्षभरानंतर पुन्हा आयुषी व सुयश भेटले. तिथे बऱ्यापैकी ओळख झाली. हळहळू गप्पा सुरू झाल्या. मग मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. (फोटो इन्स्टाग्राम)

सुयश टिळक आणि आयुषी भावे ( Aayushi Bhave) हे मराठी मनोरंजन विश्वातील स्वीट कपल आहेत.