सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:11 IST2025-11-26T16:59:22+5:302025-11-26T17:11:02+5:30
'बिग बॉस' फेम सूरज चव्हाण लवकरच अडकणार विवाहबंधनात; प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये पत्नी संजनासोबत खास लूकमध्ये दिसला!

'बिग बॉस मराठी ५' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून केवळ प्रेक्षकांची मनं जिंकून शोचा विजेता ठरलेला रीलस्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

सूरजची दोन स्वप्न होती. पहिलं घर बांधण्याचं आणि दुसरं लग्नाचं. यातील पहिलं घर बांधण्याचं स्वप्न पुर्ण झालंय. अलिकडेच त्यानं आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केलाय. सूरजचे हे नवे घर अलिशान, प्रशस्त आणि अत्यंत सुंदर आहे.

हे घर त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिले आहे. 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यानंतर अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं. ते त्यांनी पुर्ण केलं.

सूरजचं दुसरं स्वप्न, ते म्हणजेच लग्न. लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत.

सूरज आपल्या चुलत मामाची मुलगी संजनासोबत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. त्यांचा हा लग्नसोहळा हा २९ नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील जेजूरी, सासवड येथे होणार आहे.

पण, लग्नाआधी सूरजनं होणारी पत्नी संजनासोबत पुण्यातील Pixel city च्या सेटवर सुंदर प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे. Pixel cityच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर या प्री-वेडिंग फोटोशूटचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे.

संजनाने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला, तर सूरजने तिच्या लूकला पूरक असा काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला. हा लूक क्लासिक आणि बोल्ड असा मेळ साधणारा आहे.

दुसऱ्या एका फोटोमध्ये संजना गुलाबी रंगाचा भरजरी लेहंगामध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तर सूरजने तिच्यासोबत मॅचिंग करत पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला.

या फोटोत सूरज संजनाला गुलाबाची फुलं देऊन प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये सूरजचा नेहमीपेक्षा अधिक हटके लूक पाहायला मिळतोय.

सूरज आणि संजना यांचे हे रोमँटिक प्री-वेडिंग फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. चाहत्यांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केलाय.

















