किती गोड दिसते सुलेखा तळवलकरची लेक टिया, अभिनेत्री नाही तर 'या' क्षेत्रात करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:30 IST2025-08-06T15:08:30+5:302025-08-06T15:30:10+5:30
"लेकीला दिल्लीला पाठवायला भीती वाटत होती पण आता...", सुलेखा तळवलकर काय म्हणाल्या?

मराठी अभिनेत्री सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar) यांच्या सौंदर्याची कायमच स्तुती होत असते. दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या त्या सून आहेत.
स्मिता तळवलकर यांचा मुलगा अंबर तळवलकरसोबत सुलेखा यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोन मुलांच्या जन्मानंतर सुलेखा यांनी वेळोवेळी करिअरमधून ब्रेक घेतला होता.
सुलेखा तळवलकर यांना टिया ही मुलगी आणि अंबर हा मुलगा आहे. टिया आईप्रमाणेच दिसायला कमालीची सुंदर आहे. अभिनय क्षेत्रात न येता तिने वेगळं क्षेत्र निवडलं. टिया नक्की काय करते?
टीया २०२१ मध्ये मिस दादर झाली. म्हणून तीही आता अभिनयात येईल असंच सगळ्यांना वाटलं. मात्र तसं झालं नाही. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सुलेखा तळवलकर म्हणतात, "मी दोन्ही मुलांना हेच सांगितलं की याकडे करिअर म्हणून बघू नका. आधी तुमचं शिक्षण पूर्ण करा. त्यातच करिअर करा."
टियाला जेईई मध्ये ९९.९ टक्के मिळाले होते. तिचा ऑल ओव्हर इंडिया ५४ क्रमांक आला. तिला दिल्लीला अॅडमिशन मिळाली. तेव्हा सुलेखा यांना दिल्लीला पाठवायची भीती वाटली होती.
मुलाखतीत टिया म्हणाली, "मी आताच हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. दादर केटरिंग कॉलेजमध्ये माझं पदवीचं शिक्षण झालं. मला लहानपणापासून जेवण बनवणं, लोकांना बोलवून त्यांना चांगलं खाऊ घालणं याची आवड होती. तेव्हापासूनच माझा या क्षेत्राकडे इंटरेस्ट वाढला. आता मी मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी दिल्लीला शिफ्ट होत आहे."
यावर सुलेखा म्हणाल्या, "आता माझ्याकडे तिला दिल्लीला पाठवण्याशिवाय पर्याय नाही. कारण मास्टर्ससाठी तिथे तिची निवड झाली आहे."